विशेष प्रतिनिधी
लखीमपूर : लोकसभा निवडणूक 2024 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, विविध जागांवर राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून रॅली सुरू आहेत, या सभेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करत काँग्रेसवर आणि सपा वर जोरदार हल्लाबोल केला. ज्या पद्धतीने काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा कारभार सुरू आहेत, ते लवकरच डायनासोरसारखे राजकारणातून नामशेष होतील, असे ते म्हणाले.’Congress, SP will become nameless like dinosaurs’, Rajnath Singh’s outcry!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर सभेत सांगितले की, ते दिवस जवळ आले आहेत जेव्हा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस भूतकाळातील गोष्ट होतील. ते म्हणाले की भाजप हा एकमेव पक्ष आहे जो आपल्या आश्वासनांवर काम करतो. यावेळी राजनाथ सिंह यांनी संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि विकासाच्या बाबतीत भारताच्या विकासाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, रामलल्ला आता झोपडीतून आपल्या राजवाड्यात गेले आहेत, यावरून भारतात रामराज्य सुरू झाल्याचे दिसून येते.
सॅम पित्रोदा यांच्यावरही साधला निशाणा
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी दिलेल्या वारसा कराच्या सल्ल्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लक्ष्य केले आहे. त्यांनी लोकांना सावध केले आणि सांगितले की, कोणतेही भारतीय कुटुंब आपल्या प्रमुखाच्या मृत्यूनंतर 55 टक्के संपत्ती सोडू शकत नाही. सॅम पित्रोदा म्हणाले होते की, अमेरिकेतील कोणतीही व्यक्ती ४५ टक्के रक्कम आपल्या मुलांना हस्तांतरित करू शकते. सरकार ५५ टक्के हिस्सा घेते. त्यांनी भारतातही असा कायदा करण्याचा सल्ला दिला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App