विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : कॉँग्रेसनेही आता पश्चिम बंगालमध्ये राष्ट्र्रपती राजवटीची मागणी केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्यााने या ठिकाणी राष्ट्र्रपती राजवटीशिवाय पर्याय नसल्याचे कॉँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे.Congress leader in Lok Sabha Adhir Ranjan Chaudhary’s demand for President’s rule in West Bengal
बीरभूम जिल्ह्यात तृणमूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर दहा जणांना जीवंत जाळण्यात आले. या पार्श्वभूमीवर बोलताना चौधरी म्हणाले, या प्रकरणी जाहीर करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) काहीही उपयोग नाही. मी बीरभूम घटनेबाबत भारताच्या राष्ट्रपतींना भेटणार आहे. त्यांना राज्यात कलम 355 लागू करण्याबाबत विचार करण्यास सुचवेन. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली आहे. बंगालमध्ये लोकांना असुरक्षित वाटत आहे.
बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट मध्ये प्रचंड हिंसाचार उसळला असून तृणमूल कॉंग्रेसचा नेता भादू शेख यांच्या हत्येनंतर बदल्याची आग भडकली आणि तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी 10 लोकांना त्यांच्या घरात कोंडून जिवंत जाळले. सोमवारी रात्री ही घटना घडली. स्थानिक निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यातून रामपुरहाट मधला तृणमूल काँग्रेसचा नेता भादू शेष यांची हत्या झाली.
त्यानंतर सोमवारी रात्री भादू शेतीच्या समर्थकांनी 10 लोकांना त्यांच्या घरात कोंडले आणि बाहेरून आग लावून दिली. त्याच वेळी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून भादू शेख समर्थक या घरांत भोवती पहारा देत होते. ही घरे पूर्ण भस्मसात झाल्यानंतरच भादू शेखचे समर्थक तेथून हालले.
आज सकाळी पोलिस रामपुरहाट मध्ये पोहोचले तेव्हा त्यांना भस्मसात झालेली घरे दिसली तसेच पोलिसांनी संपूर्ण जळलेल्या अवस्थेतले 10 मृतदेह बाहेर काढले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचार यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता कोलकात्त्याचे महापौर आणि राज्याचे मंत्री फरहात हकीम यांना रामपूर हटला पाठवले असून पोलिसांना देखील ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App