गांधी बहिण-भावांना धर्मनिरपेक्ष म्हणत कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची मुक्ताफळे, बाटला हाऊस एन्काऊंटरमधील दहशतवाद्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : बाटला हाऊस एन्काऊंटरमध्ये दहशतवादी नव्हे तर मुस्लिम तरण मारले गेले. त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी एका मौलानाने केली आहे. गांधी बहिण-भावांना धर्मनिरपेक्ष म्हणत या मौलानांनी नुकताच कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.Congress leader demand for Martyrdom of Terrorists in Batla House Encounter

अल हजरत बरेली शरीफचे मौलाना तौकीर रजा खान यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरबाबत बोलताना म्हटले आहे की, बाटला हाऊस चकमक बनावट होती आणि चकमकीत दहशतवादी मारले गेले नाहीत आणि पोलिसांकडूनच इन्स्पेक्टर महेशचंद्र शर्मा यांची हत्या झाली. २००९ मध्ये सरकार स्थापन होताच या चकमकीची प्रथम चौकशी केली जाईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाने दिले होते,



पण पक्षाने तसे केले नाही. चकमकीत मारल्या गेलेल्या तरुणांना शहीद दर्जा द्यावा. काँग्रेसला मुस्लिमांच्या मनोधैयार्ची नाही तर पोलिसांच्या मनोबलाची चिंता आहे.तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येण्याचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, मी काँग्रेस जवळून पाहिली आहे. मला असे वाटले की काँग्रेसला आरएसएसच्या लोकांनी चारही बाजूंनी घेरले आहे.

मी नेहमीच काँग्रेसला विरोध केला आहे आणि करत राहीन. आता जेव्हा मी प्रियंका गांधींना भेटलो तेव्हा मला जाणवले की, यावेळी देशात खºया अथार्ने धर्मनिरपेक्ष असलेले, लोकशाहीवर विश्वास असलेले दोन भाऊ-बहीण आहेत. बाकी सगळे ढोंगी आहेत.ह्व

तौकीर रझा यांनी म्हटले आहे की, आम्ही नेहमीच काँग्रेसच्या विरोधात होतो हे खरे आहे. २००९ मध्ये, जेव्हा मी काँग्रेससोबत होतो आणि जिंकलो तेव्हा मी मंचावर सांगितले होते की, काँग्रेसली मी माफ केले आहे असे समजू नये. काँग्रेसने मला आता पॅरोलवर सोडले, भविष्यात तुमचे काम चांगले झाले तर तुमचा विचार केला जाईल.

पण त्यांना वाटले की माझे सरकार स्थापन झाले आहे. त्यांनी मला सांगितले होते की, सरकार स्थापन केल्यानंतर आमचे पहिले काम बाटला हाऊस चकमकीची चौकशी करणे असेल. या चकमकीची चौकशी झाली असती, तर जगाला कळले असते की, मारले गेलेले दहशतवादी नव्हते, त्यांना हुतात्मा दर्जा द्यायला हवा. जे इन्स्पेक्टर शर्मा मारले गेले होते, त्यांना त्यांच्या पोलिसांनी मारले होते.

तपास न झाल्यास पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होईल, असे ते म्हणाले. पोलिसांच्या मनोबलाची त्यांना अधिक काळजी असेल. २० कोटी मुस्लिमांच्या मनोबलाची पर्वा केली नाही. आमची मुले दहशतवादी म्हणून मारली गेली. माझ्या तक्रारी नेहमीच काँग्रेसकडे आहेत.

१३ सप्टेंबर २००८ रोजी राजधानी दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते, ज्यात ३९ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १५० हून अधिक लोक जखमी झाले होते. १९ सप्टेंबर २००८ रोजी बाटला हाऊस येथे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आणि एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले, तर दोन दहशतवादी पळून गेले. या चकमकीत इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा शहीद झाले आणि पोलीस कर्मचारी बलवंत यांना गोळी लागली होती.

Congress leader demand for Martyrdom of Terrorists in Batla House Encounter

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात