विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांना दीडशेचा टप्पा गाठणेही शक्य होणार नसल्याचा अंदाज झी मीडिया आणि डिझाईन बॉक्स्ड यांनी केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.BJP to get clear majority in Uttar Pradesh, It is difficult for Akhilesh to reach the stage of 150
उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांबाबत केलेल्या या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले आहे.
सर्वेक्षणात म्हटले आहे की, भाजपला 245-267 जागा मिळू शकतात. समाजवादी पक्ष-125-148 जागा मिळण्याचा अंदाज आहे.बहुजन समाज पक्षाला 5-9 जागा तर काँग्रेस- 3-7 जागांवरच थांबणार आहे. इतर पक्षांना 2-6 जागा असू शकतात.
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी योगी आदित्यनाथांनाच सर्वाधिक पसंती आहे. 47 टक्के लोकांनी योगी सीएम असावे असे म्हटले आहे. अखिलेश यादव यांना 35 टक्के लोकांनी पसंती दर्शविलीअहे. मायावती यांची लोकप्रियता खूपच घटली असून 9 टक्के लोकांनी त्यांनी मुख्यमंत्री व्हावे असे म्हटले आहे. कॉँग्रेसच्या सरचिटणिस तर प्रियांका गांधी वाड्रा यांना केवळ 5 टक्के लोकांनी पसंत केले आहे. 4 टक्के लोकांना मुख्यमंत्री म्हणून याव्यतिरिक्त चेहरा हवा आहे.
भाजपला सर्वाधिक 41 टक्के मते मिळतील तर समाजवादी पक्षाकडे 34 टक्के मते मिळतील. बसपचा मतांचा टक्का घटून 10 टक्के झाला आहे. काँग्रेस पक्ष 6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 9 टक्के इतरांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more