सिद्धरामय्या हेच आमचे राम, अयोध्येत कशाला जाऊ??; कर्नाटकात माजी मंत्र्याच्या मुक्ताफळांमुळे काँग्रेस अडचणीत!!

विशेष प्रतिनिधी

बंगळुरु : अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा होत असताना देशात अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे, पण वेगवेगळे नेते आपल्या वेगवेगळ्या मुक्ताफळांनी त्या वातावरणात बिब्बे घालण्याचे काम करत आहेत. कर्नाटकात एका माजी मंत्र्याने अशीच मुक्ताफळे उधळून आपल्याच पक्षाला अडचणीत आणले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच माझे राम आहेत, मग मी अयोध्येत जाऊन त्या रामाची पूजा कशाला करू??, अशी मुक्ताफळे माझी मंत्री एच. के. अंजनेय यांनी करून काँग्रेस नेतृत्वाला अडचणीत आणले आहे. Congress in trouble due to ex-minister’s acquittal in Karnataka

एकीकडे विश्व हिंदू परिषदेने सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अधीरंजन चौधरी या काँग्रेसच्या बड्या नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. त्या सोहळ्याला जायचे की नाही या मुद्द्यावर या नेत्यांची कोंडी झाली आहे. सोहळ्याला आपण गेलो तरी मूळात क्रेडिट भाजपलाच मिळणार आहे आणि नाही गेलो तर आपली हिंदू विरोधी प्रतिमा अधिक गडद होण्याची भीती या काँग्रेस नेत्यांना वाटत आहे आणि तशातच काँग्रेसचे बाकीचे नेते वेगवेगळी मुक्ताफळे उधळून आपल्याच पक्षाच्या बड्या नेत्यांना आणखी अडचणीत आणत आहेत.

*कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि काँग्रेस नेते होलालकेरे अंजनेय यांनी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची प्रभू रामचंद्रांबरोबर तुलना केली. सिद्धरमय्या हे स्वत:च राम आहेत. मग, अयोध्येच्या मंदिरातील रामाची पूजा का करायची??, तो भाजपाचा राम आहे. भाजपा हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहे. त्यांना जे करायच ते करुं दे, अशी मुक्ताफळे होलालकेरे अंजनेय यांनी उधळली.

पण एवढीच मुक्ताफळे उधळून अंजनेय हे थांबले नाहीत. त्यांनी स्वतःच्या नावाचा अर्थ सांगून आपल्या आधीच्या वक्तव्याचे समर्थन केले. ते म्हणाले, की आमचा राम आमच्या ह्दयात आहे. माझे नाव अंजनेय आहे, तुम्हाला माहितीय त्याने काय केलेय?? अंजनेय हे भगवान हनुमानाचे दुसर नाव आहे. हनुमान हे प्रभू रामचंद्रांसोबत असायचे.

होलालकेरे अंजनेय यांच्या या मुक्ताफळांवर भाजपा नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी प्रतिक्रिया दिली. हे राज्याच दुर्देव आहे, असे मूर्ख, हिंदू विरोधी नेते भूतकाळात राज्याचे मंत्री होते. प्रभू रामचंद्रांबद्दल बोलण थांबवा, प्रभूराम हे हिंदूंचे आदर्श आहेत, त्यांचा आदर करा, असा टोला बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी हाणला.

Congress in trouble due to ex-minister’s acquittal in Karnataka

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात