विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकात भाजपचा पराभव करून मोठे बहुमत मिळवणाऱ्या काँग्रेसला आपला मुख्यमंत्री निवडायला चार दिवस लागले. यामध्ये सिद्धरामय्या विरुद्ध डी. के. शिवकुमार यांचा वैयक्तिक राजकीय सामना असला तरी त्या पाठीमागची बरीच कारणे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विचारात घेऊन शिवकुमार यांच्या ऐवजी सिद्धरामय्या यांची नेतृत्वपदी निवड केली आहे.Congress highcommand choose siddaramaiah over shivkumar to further consolidate Muslim vote bank
या बऱ्याच कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना अपेक्षित असणारे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण सिद्धरामय्या हे शिवकुमार यांच्यापेक्षा जास्त आक्रमक पद्धतीने करू शकतात, हे असल्याचे मानण्यात येत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यान जेव्हा बजरंग दलावरील बंदीचा मुद्दा समोर आला आणि तो काँग्रेसवर उलटण्याची चिन्हे दिसायला लागली तेव्हा डी. के. शिवकुमार यांनी अचानक आपला पवित्रा बदलून हनुमान दर्शन घ्यायला सुरुवात केली. आपली प्रतिमा हिंदुत्ववादी नव्हे पण कट्टर हिंदू अशी तयार करण्यावर भर दिला.
या उलट सिद्धरामय्या यांनी राहुल गांधीं सारखा टेम्पल रन जरूर केला पण त्यांनी जाणीवपूर्वक आपली प्रतिमा “हिंदू” बनणार नाही, याची काळजी घेतली. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर यातला राजकीय बारकावा स्पष्ट झाला. 88% मुस्लिम मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. या मुस्लिम ध्रुवीकरणात सिद्धरामय्या यांनी दक्षिण कर्नाटकात विशेष भूमिका निभावल्याचे काँग्रेस श्रेष्ठींचे मत आहे. कारण त्याच परिसरात आणि काही प्रमाणात उत्तर कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलाची मुस्लिम मते फोडण्यात सिद्धरामय्या यशस्वी झाले. जेडीएसच्या एकूण व्होट बँकेतील 5 % मते फुटली. यात शिवकुमार यांच्यापेक्षा सिद्धरामय्या यांचा हात अधिक मोठा आहे हे काँग्रेस श्रेष्ठींना जाणवले.
त्या उलट डी. के. शिवकुमार यांची भाजपवर कुरघोडी करण्याची स्ट्रॅटेजी म्हणून “हिंदू प्रतिमा” बनवून संपूर्ण कर्नाटकभर फिरणे योग्य ठरली, पण त्यांची ही “हिंदू प्रतिमा”च त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसविण्याच्या आड आली.
सिद्धरामय्या हे मूळचे काँग्रेसवाले नाहीत. ते मूळचे देवेगौडांच्या जनता दलाचे. देवेगौडांनी त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते त्यांना सोडून काँग्रेसमध्ये आले आणि मुख्यमंत्री झाले. आता देखील आपली डावीकडे झुकणारी भूमिका सिद्धरामय्या यांनी सोडलेली नाही. स्वतःची “हिंदू प्रतिमा” तयार होऊ दिली नाही. याचीच बक्षिसी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना मुख्यमंत्री पदाच्या रूपात दिल्याचे मानण्यात येते.
काँग्रेस श्रेष्ठींची असाइनमेंट
कर्नाटकच्या निवडणुकीतून काँग्रेसला पुन्हा एकदा आपल्या विजयाची मुळी गवसल्याचे दिसत आहे. मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण हा काँग्रेसचा जुना पक्का विजयी फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला घट्ट करण्याचे काम सिद्धरामय्या यांच्याकडे काँग्रेस श्रेष्ठींनी सोपविले आहे. ते काम शिवकुमार यांच्यापेक्षा सिद्धरामय्या जास्त चांगले करू शकतात, असा काँग्रेस श्रेष्ठींचा यातला होरा आहे आणि म्हणूनच काँग्रेस श्रेष्ठींनी शिवकुमार यांच्या ऐवजी सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री पदी निवड केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App