कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!


कर्नाटक मधल्या काँग्रेसच्या विजयानंतर त्याचे जे राजकीय पडसाद देशभरात उमटणार आहेत, त्यातून भाजपला धोका उत्पन्न होण्यापेक्षा प्रादेशिक पक्षांना उत्पन्न होणारा धोका अधिक आहे, असेच कर्नाटक मधली मतदानाची टक्केवारी आणि प्रत्यक्ष आकडेवारी सांगते. Congress can snatch away muslim vote share of NCP in maharashtra like they did it karnataka form JDS

कर्नाटकात काँग्रेसने भाजपचे सरकार उखडून टाकले हे जितके खरे आहे, तितकेच मतदानाच्या टक्केवारी आणि आकडेवारीनुसार काँग्रेसने देवेगौडांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचा अर्थात जेडीएसचा पूर्ण सफाया केला हे त्यापेक्षाही खरे आहे. पण त्यासाठी जेडीएसच्या सफायाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे.

जेडीएसचा व्होटर बेस उखडला

जेडीएसचा व्होटर बेस उत्तर कर्नाटकातील मुस्लिम बहुल परिसरात आणि म्हैसूर कर्नाटकातल्या विशिष्ट मतदारसंघांमध्ये होता. हा प्रभाव काँग्रेसने मोडून काढला आहे. कर्नाटकात जेडीएसला काँग्रेसने 17 जागांचा फटका दिला आहे. जेडीएस अवघ्या 19 जागांवर विजय मिळवू शकला आहे. त्याहीपेक्षा भाजपचा पराभव करताना काँग्रेसने जेडीएसला मतदानाच्या टक्केवारीत जो 5% फटका दिला आहे, तो सर्वच्या सर्व जेडीएसच्या मतदानाचा मुस्लिम टक्का होता. मुस्लिम समाजाने म्हैसूर कर्नाटकात काँग्रेसला सर्वत्र विजय मिळवून दिला आहे. हा तोच एरिया आहे, जिथे एकेकाळी टिपू सुलतान चे राज्य होते. त्यामुळेच काँग्रेसने म्हैसूर कर्नाटकात प्रचार करताना टिपू जयंती सरकारी पातळीवर पुन्हा साजरी करण्याची घोषणा केली होती. याचा लाभ काँग्रेसला मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणातून झाला. भाजप पेक्षा 7% मते काँग्रेसने जास्त मिळवली आणि त्यातली 5% मते काँग्रेसने जीडीएसची खेचली पण त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्या तब्बल 60 जागांचा मोठा फरक पडला आणि इथेच जेडीएस काँग्रेससाठी “राजकीय गिऱ्हाईक” ठरला!!

मोहब्बत की दुकान शुरू

काँग्रेसने भाजपला पराभूत करताना जेडीएसच्या राजकीय अस्तित्वालाच नख लावले. जेडीएसचा सगळा मुस्लिम व्होटर बेस आपल्याकडे खेचून घेतला. त्यासाठी बजरंग दलावरील बंदीचा फंडा वापरला. हिजाबबाबत लवचिक भूमिका घेतली. हे सगळे राहुल गांधींच्या “नफरत का बाजार बंद, मोहब्बत की दुकान शुरू” या राजकीय व्याख्येत बसवले.

कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी

जे काँग्रेसने कर्नाटकात जेडीएसच्या बाबतीत घडविले, तेच काँग्रेस महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या बाबतीत घडवू शकते, अशी स्थिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे स्वतंत्रपणे व्होटर बेसचे निरीक्षण केले, तर एक बाब अधोरेखित होईल ती म्हणजे काँग्रेसची मूळ व्होट बँक दलित, मुस्लिम आणि मराठा राहिली आहे. राष्ट्रवादीची मूळ व्होट बँक काँग्रेस मधूनच बाजूला काढून मराठा आणि मुस्लिम अशी राहिली आहे. याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीने कायमच काँग्रेसला मराठा वोट बँकेद्वारे फटका दिला आहे. पण मुस्लिम वोट बँकेतला शेअर देखील राष्ट्रवादीने स्वतःकडे खेचून काँग्रेसला आणखी मोठा फटका दिला आहे.

वास्तविक संघटनात्मक पातळीवर काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली आहे. काँग्रेस ही राष्ट्रवादी सारखी पश्चिम महाराष्ट्र मर्यादित पार्टी नाही. पण तरी देखील राष्ट्रवादीने मराठा आणि मुस्लिम वोट बँकेत सेंधमारी केली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

काँग्रेसची स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात वर्क

अशा स्थितीत कर्नाटक मधली स्ट्रॅटेजी काँग्रेसने महाराष्ट्रात अवलंबली, तर काँग्रेस काही प्रमाणात राष्ट्रवादीला मराठा आणि मुस्लिम व्होट शेअर खेचून मोठा फटका देऊ शकते आणि इथेच राष्ट्रवादीचा जेडीएस होऊ शकतो.

राष्ट्रवादीची मुस्लिम मते खेचणे काँग्रेसला शक्य

राष्ट्रवादीने आपला व्होटर बेस वाढविताना मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात मुस्लिम लांगूलचालन अनेकदा केले. नवाब मलिक यांना त्यासाठीच राजकीय दृष्ट्या वापरले. पश्चिम महाराष्ट्रातील मुस्लिम व्होट शेअर राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचला. पण तो मुळातला काँग्रेसचा व्होट शेअर आहे. आता
काँग्रेस जर कर्नाटकची स्ट्रॅटेजी वापरून महाराष्ट्रात मुस्लिम वोट शेअर आपल्याकडे पुन्हा खेचून घेऊ शकली, तर त्याचा फटका शिवसेना, भाजप, मनसे यांना बसण्यापेक्षा तो राष्ट्रवादीला निश्चित अधिक बसेल आणि इथेच नेमके राष्ट्रवादीचे जेडीएसशी साम्य आहे. बाकी दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या तंबूवर टिकले आहेत हे वेगळे साम्य आहे. पण व्होटर बेस हा निकष मानला तर जेडीएस कडे वक्कलिंग आणि मुस्लिम, तसा राष्ट्रवादीकडे मराठा आणि मुस्लिम हा व्होटर बेस आहे. यातल्या मुस्लिम व्होटर बेस राष्ट्रवादी पासून दूर गेला तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा जेडीएस व्हायला वेळ लागणार नाही आणि ते काम भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट, मनसे यांच्यापेक्षा काँग्रेसच अधिक राजकीय कौशल्याने करू शकेल ही वस्तुस्थिती आहे.

कर्नाटकात काँग्रेसने मुस्लिम व्होट शेअर खेचून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जेडीएसला “राजकीय गिऱ्हाईक” बनविले, महाराष्ट्रातही तशाच प्रकारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही “राजकीय गिऱ्हाईक” बनवणे काँग्रेसलाच शक्य आहे, इतरांना नाही!!

Congress can snatch away muslim vote share of NCP in maharashtra like they did it karnataka form JDS

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात