केरळमध्ये NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; तब्बल १२ हजार कोटींचे २५०० किलो ड्रग्ज जप्त!


या मालासह एका संशयित पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेतले आहे.

विशेष प्रतिनिधी

कोची  : केरळमध्ये NCB आणि भारतीय नौदलाने संयुक्त कारवाई करत तब्बल १२ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. छाप्यामध्ये २५०० किलो मेथॅम्फेटामाईन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. NCB and Indian Navy seizes approx 2500 kg high purity methamphetamine

देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मेथॅम्फेटामाइन औषधांची खेप सापडली आहे. नौदलाने या मालासह एका संशयित पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. हे ड्रग्ज अफगाणिस्तानातून केरळमध्ये समुद्रमार्गे आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. NCB व्यतिरिक्त, या जप्ती श्रीलंका आणि मालदीवशी शेअर केलेल्या इनपुटच्या आधारे झाल्या आहेत.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या कारवाईत सुमारे ३२०० किलो मेथॅम्फेटामाइन, ५०० किलो हेरॉईन आणि ५२९ किलो चरस जप्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातून भारतात आणल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या विरोधात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

NCB and Indian Navy seizes approx 2500 kg high purity methamphetamine

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात