विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात महापालिकांचे महापौर, नगरपालिकांचे आणि नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांची 75 जिल्ह्यांमध्ये निवडणूक होऊन त्यामध्ये भाजपचा सर्वत्र विजय झाल्यानंतर अद्याप विरोधकांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरुद्ध आरडाओरडा का केला नाही??, याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. Why opposition not crying against EVM after debacle in uttar Pradesh local elections??
एकाच दिवशी आज 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणुकांचे निकाल लागले. त्यात कर्नाटकात काँग्रेसला मोठा विजय मिळाला आणि उत्तर प्रदेशात भाजपला विजय मिळाला. हे दोन्ही विजय ईव्हीएमच्या आधारेच मिळाले. म्हणून तर विरोधकांना त्याविरुद्ध आरडाओरडा करायची संधी मिळाली नाही का??, अशी शंका अनेकांनी सोशल मीडियावर बोलून दाखवली.
Uttar Pradesh results : आयेगा फिरसे रामराज्य – भाजपच्या विजयाने अपर्णा यादव भारावल्या! मुलायम सिंग यांच्या धाकट्या सूनबाई काय म्हणाल्या जाणून घ्या…
कर्नाटकात काँग्रेसचा पराभव आणि भाजपचा विजय झाला असता तर निश्चितपणे विरोधकांनी नेहमीप्रमाणे ईव्हीएम मध्ये “दोष” दिला असता. या दोन्ही निवडणुकांपूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विरोधी पक्षांनी ईव्हीएम विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्याच होत्या. पण त्यानंतर देखील कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका ईव्हीएम द्वारेच पार पडल्या. त्यात कर्नाटकात काँग्रेसला विजय मिळाला आणि उत्तर प्रदेशात भाजपला यश मिळाले. त्यामुळे ईव्हीएमचा “दोष” काढणे नेमके कोणाच्या राजकीय सोयीचे नव्हते??, असा खोचक सवाल अनेकांनी सोशल मीडियावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App