वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस ही भाऊ-बहिणीची पार्टी बनली असून बाकीच्यांची सुटी झाली आहे, अशी टीका भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना उद्देशून केली आहे. Congress became a party of brothers and sisters, the rest of the leaders had a holiday; BJP president Nadda’s strong criticism
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे रोड शो आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ना भारतीय आहे, ना राष्ट्रीय, ना काँग्रेस. “ही केवळ भाऊ-बहिणीची पार्टी झाली आहे, बाकी च्या नेत्यांची सुट्टी आहे.” नड्डा यांच्या मते, भाजप वगळता सर्व पक्ष प्रादेशिक किंवा कौटुंबिक पक्ष बनले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more