4 जून पूर्वीच काँग्रेसची चतुराई; पवार + अखिलेश + केजरीवालांसारख्या प्रादेशिक नेत्यांवरच टाकली INDI आघाडीच्या विस्ताराची जबाबदारी!!

नााशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक जरी त्यांना राजनीतीचे धुरंधर किंवा “चाणक्य” म्हणत असले, तरी प्रत्यक्षात केंद्रातल्या राजकारणात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांसमोर पवारांचे राजकारण तोकडेच पडते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. शरद पवारांची ज्येष्ठता काँग्रेस नेते मान्य करतात, पण त्या ज्येष्ठतेनुसार पवारांना काँग्रेसचे नेते असाइनमेंट देतातच, असे अजिबात घडत नाही. याचे उदाहरण उद्या 1 जून 2024 च्या विरोधकांच्या INDI आघाडीच्या बैठकीपूर्वी समोर आले आहे. Congress assign INDI alliance expansion endeavor to regional leaders like pawar, akhilesh and kejriwal

उद्या लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या मतदान सुरू असताना किंवा आटोपल्यानंतर राजधानी नवी दिल्लीत INDI आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्या बैठकीत आघाडीच्या विस्तारा संदर्भात चर्चा आणि निर्णय होणे अपेक्षित आहे आणि या विस्ताराची जबाबदारी काँग्रेसने चतुराईने शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर टाकली आहे, पण ही जबाबदारी टाकताना देखील काँग्रेसने अशी काही चतुराई केली आहे की, पवारांना त्यांच्या ज्येष्ठतेचा मान दिला असे वाटावे तर खरे, पण प्रत्यक्षात अनेक प्रादेशिक नेत्यांपैकी ते एक नेते आहेत, याची देखील त्यांना जाणीव व्हावी, अशी असाइनमेंट त्यांना काँग्रेसने दिली आहे.

याची कहाणी अशी :

काँग्रेसला 4 जून 2024 नंतर देशात सत्तांतर घडवायचे आहे. हे सत्तांतर घडवण्यासाठी मोदींचा पराभव करणे अपेक्षित असून मोदींना जर 250 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्यांच्या भोवतीचे किंवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप पासून समान अंतर राखलेले प्रादेशिक पक्ष INDI आघाडीत आणले पाहिजेत, असे काँग्रेस नेतृत्वाला वाटते आहे आणि याच प्रादेशिक पक्षांना INDI आघाडीत आणायची जबाबदारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारख्या अनेक नेत्यांवर टाकली आहे.

शरद पवार यांच्यावर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना पटवून त्यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष INDI आघाडीत आणण्याची जबाबदारी सोपविली आहे, तर अखिलेश यादव यांच्यावर ममता बॅनर्जी यांना पटवण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना पटवून INDI आघाडीत आणण्याची जबाबदारी काँग्रेसने अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव या दोन नेत्यांवर टाकली आहे.

वास्तविक INDI आघाडी स्थापन झाली तेव्हा शरद पवार यांच्यावर अनौपचारिकपणे समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती. पण त्यांच्या समन्वयक पदाच्या नेतृत्वाखाली INDI आघाडीची फार मोठी बैठक झाल्याची बातमी आलीच नाही किंवा जागा वाटपाची औपचारिक चर्चा झाल्याची बातमी आली नाही.

आता लोकसभेचे निकाल लागणार असल्याच्या दिवशी फार मोठा उलटफेर झाला, तर सरकार बनवण्यासाठी काँग्रेसला पुढाकार घ्यावा लागेल आणि हा पुढाकार घेताना प्रादेशिक पक्षांची मदत लागेल हे लक्षात घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. मोदींचा पराभव होऊन आपली INDI आघाडीची सत्ता आलीच, तर तुम्हाला सत्तेत वाटा देऊ. पण तो वाटा हवा असेल, तर आम्ही सांगू ती कामे करावी लागतील, हा “सुप्त संदेश” काँग्रेसच्या वरिष्ठांनी शरद पवार, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांना असाइनमेंट मधून दिला आहे.

पवार + अखिलेश आणि केजरीवाल यांना दिलेल्या असाइनमेंट व्यतिरिक्त अन्य काही पक्षही काँग्रेस आणि भाजप यांच्यापासून समान अंतरावर आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर पंजाबमध्ये अकाली दल, ओडिशात बिजू जनता दल, अझरुद्दीन ओवेसी यांचा पक्ष “एआयएमआयएम”, हरियाणातील जननायक जनता पार्टी, तामिळनाडूतील अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे पक्ष कोणत्याही आघाडीत नाहीत. त्यामुळे त्यांना पटवण्याची जबाबदारी देखील काँग्रेस नेत्यांवर किंवा अन्य प्रादेशिक नेत्यांवर येण्याची शक्यता आहेच.

शिवाय चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देशम आणि नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हे दोन पक्ष सध्या जरी मोदींबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असले, तरी त्यांना चुचकारण्याची जबाबदारी देखील काँग्रेसचे नेते अन्य प्रादेशिक नेत्यांवर टाकू शकतात.

Congress assign INDI alliance expansion endeavor to regional leaders like pawar, akhilesh and kejriwal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात