विशेष प्रतिनिधी
जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेश, छत्तीसगड पाठोपाठ राजस्थानातही भाजपचे नेते कार्यकर्ते विरोधी पक्ष आणि प्रसार माध्यमे यांना चकवा देऊन नवेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी निवडले. भजनलाल शर्मांच्या रूपाने राजस्थानात नवागडी नवे राज्य आणले. महाराष्ट्रात भाकरी फिरवण्याच्या नुसत्याच बाता मारणाऱ्या नेत्याच्या वाढदिवशी मोदींनी 3 राज्यांमधल्या नेतृत्वाच्या अशा काही भाकऱ्या फिरवल्या की, त्यामुळे भलेभले चकले आणि अनेकांचे हात त्या भाकऱ्यांमुळे भाजले. cm rajasthan Bhajanlal Sharma’s political performance
राजस्थानात भजनलाल शर्मा यांच्या रूपाने पहिल्यांदाच आमदार झालेल्या नेत्याला पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री केले. स्वतः मोदी आमदार नसतानाच गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. त्याआधी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप या दोन संघटनांचे वरिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करत होते. दोन्ही संघटनांमधला ते दुवा होते. भाजपचे सरचिटणीस होते. भजनलाल शर्मा आणि मोदी यांच्यात एवढ्या पुरते साम्य आहे. फक्त मोदी दिल्लीत सरचिटणीस होते, तर भजनलाल शर्मा हे राजस्थानात चार वेळा भाजपचे सरचिटणीस राहिले.
#WATCH via ANI Multimedia | Rajasthan के नए CM का हुआ एलान, Bhajan Lal Sharma समेत ये 2 उपमुख्यमंत्री संभालेंगे प्रदेश की बागडोरhttps://t.co/awWhPGgFTZ — ANI_HindiNews (@AHindinews) December 12, 2023
#WATCH via ANI Multimedia | Rajasthan के नए CM का हुआ एलान, Bhajan Lal Sharma समेत ये 2 उपमुख्यमंत्री संभालेंगे प्रदेश की बागडोरhttps://t.co/awWhPGgFTZ
— ANI_HindiNews (@AHindinews) December 12, 2023
याचा अर्थ राजस्थानातल्या भाजप मधल्या अंतर्गत वर्तुळात भजनलाल शर्मांचा प्रचंड कनेक्ट आणि दबदबा आहे. ग्राउंड लेव्हलवर काम करून त्याचा फीडबॅक वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले. त्यामुळे भाजपची अंतर्गत यंत्रणा कुठे कशी आणि केव्हा हलवायची??, याची पुरेपूर माहिती भजनलाल शर्मांना असल्याचे दिसून येते.
2023 च्या निवडणुकीत भाजपने सांगानेर या सुरक्षित म्हणजेच भाजपच्या बालेकिल्ल्यातून पहिल्यांदा निवडून आणले. त्यासाठी भाजपने तिथले विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापले. पण हे सगळे कशासाठी केले??, या राजकीय घडामोडीची पक्षांतर्गत नेत्यांना विरोधकांना आणि माध्यमांना साधी भनकही लागली नव्हती.
राजनाथ सिंह – वसुंधरा राजे चर्चा
भजनलाल शर्मा यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वसुंधरा राजे यांच्याशी स्वतंत्रपणे 10 मिनिटे चर्चा केल्याचे बोलले जात आहे. भजनलाल शर्मांचे नाव मुख्यमंत्री पदाचे पदासाठी सुचवायचे हे राजनाथ सिंह यांनी वसुंधरा राजे यांना स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर निवडक नेत्यांशी त्यांनी चर्चा केली आणि विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत स्वतः वसुंधरा राजे यांनी भजनलाल शर्मांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवले, असे बोलले जात आहे.
यातूनच भजनलाल शर्मांचे संघ आणि भाजप संघटनेत किती आणि कसे वजन आहे??, हेच स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याबरोबरच दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री करून राजस्थानचा सगळा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या टीमच्या हातात सोपविला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजस्थानातून सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याची पहिली जबाबदारी या नव्या टीमला पार पाडावी लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App