CJI Chandrachud : निवृत्तीनंतर CJI चंद्रचूड ‘हे’ काम आधी करणार!

CJI Chandrachud

दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबतही केली टिप्पणी, म्हणाले..


विशेष प्रतिनिधी

दिल्ली: CJI Chandrachud भारताचे 50 वे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी आपल्या पदावरून निवृत्त होणार आहेत. निवृत्तीनंतरच्या योजनांबाबत विचारले असता, सुरुवातीचे काही दिवस विश्रांती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांनी भारताच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली आणि सुमारे दोन वर्षे या पदावर राहिले.CJI Chandrachud



सीजेआय चंद्रचूड यांनी गुरुवारी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीतील वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे त्यांनी मॉर्निंग वॉक करणे बंद केले आहे. सुप्रीम कोर्टात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना, CJI चंद्रचूड म्हणाले की त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सकाळी बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे, कारण श्वसनाचे आजार टाळण्यासाठी घरातच राहणे चांगले आहे. हवेतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, मी आजपासून (२४ ऑक्टोबर) मॉर्निंग वॉक करणे बंद केले आहे. मी सहसा सकाळी 4-4.15 वाजता फिरायला जातो.

CJI ने सुप्रीम कोर्टाची कार्यवाही कव्हर करणाऱ्या पत्रकारांना मान्यता देण्यासाठी कायद्याची पदवी असण्याची अनिवार्य अट रद्द केल्याचीही घोषणा केली. ते म्हणाले की, मान्यताप्राप्त पत्रकारांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांची वाहने पार्क करण्याची सुविधा मिळणार आहे.

CJI Chandrachud will do this work first after retirement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात