विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदानाचा टक्का वाढवावा, या हेतूने नाशिक शहरात उद्या 20 मे 2024 सोमवारी होणारे 7 निकाह शहर काझींनी पुढे ढकलले आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढायला हवा. त्यामुळे सोमवारी होणारे निकाह आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून ते पुढे ढकलले अशी माहिती स्वतः शहर ए काझी एजाज काझी यांनी दिली. City Qazis postpone 7 Nikahs in Nashik to increase Muslim voter turnout
महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का इतर राज्यांपेक्षा घसरलेला दिसला तर सर्व राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 60 % ते 65 % अशी ओलांडली असताना महाराष्ट्रातले मतदान 55 % च्या रेंजमध्ये राहिले.
या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातला मुसलमान मतांचा टक्का वाढवण्यासाठी शहर ए काझी एजाज काझी आणि मुस्लिम धर्मगुरू शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन खतीब यांनी सोमवारी होणारे 7 निकाह आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. आता हे 7 निकाह मंगळवारी म्हणजे 21 जून रोजी होणार आहेत, तसेच सार्वजनिक कार्यक्रम आहे इतर दिवशीच होणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App