वृत्तसंस्था
लेह : पूर्व लडाखजवळच्या सीमेवर चीनचा युद्धाभ्यास सुरु केला आहे. भारतीय सैन्य चीनच्या सैन्यावर आणि प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवून आहे. China’s war games on the eastern Ladakh border, military involvement with fighter jets; India’s eye on that
भारतीय सैन्यातील काही विश्वासार्ह सूत्रांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच चीनचं सैन्य विविध हवाई तळांवर युद्धाभ्यास करत आहे. तब्बल 24 हून अधिक लढाऊ विमानांनी भाग घेतला. यामध्ये जे 11 आणि जे 16 ही सहभागी होते.
चीनच्या सैन्यानं तिबेट आणि शिनजियांग प्रांतात हा युद्धाभ्यास केला. यामध्ये होटान, गर गुंसा, कासगर, हॉपिंग, डोंगा- झोंग, लिंझी आणि पनगट या हवाई तळांचा समावेश होता. लढाऊ विमानांसह लष्करही सहभागी झालं होते.
चीनचा युद्धाभ्यास आणि प्रत्येक हालचालीवर भारताकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. भारतीय वायुदलाचे मिग 29 यांची एक संपूर्ण तुकडी लेह- लडाखमध्ये तैनात आहे. राफेल लढाऊ विमानंही लडाखच्या हवाई तळांवरुन घिरट्या घालत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App