वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेने चीनचा एकच स्पाय बलून फोडल्यानंतर फुग्याच्या अवशेषांमधून चीनचे मोठे कारस्थान उघड झाले आहे. अमेरिकेने फोडलेला चीनचा हा स्पाय बलून कम्युनिकेशन सिग्नल गोळा करण्यात सक्षम होता. त्याद्वारे अन्य स्पाय बलूनशीही संपर्क होता. चीनने अमेरिकेप्रमाणे 40 देशांमध्ये असे स्पाय बलून सोडले आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. China’s spy balloon in over 40 countries
चीनच्या स्पाय बलूनमध्ये कम्युनिकेशन सिग्नल गोळा करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान होते. अमेरिकेने आकाशात उडणारा चिनी स्पाय बलून 5 फेब्रुवारी रोजी फोडला होता. अमेरिकेने लढाऊ विमानाच्या मदतीने क्षेपणास्त्र मारा करत हा स्पाय बलून फोडला होता. त्यानंतर बुधवारी अमेरिकेने नौदलाला या स्पाय बलूनचे अवशेष अटलांटिक महासागारता सापडले. या अवशेषांवरुन अमेरिका या स्पाय बलूनसंदर्भात पुढील तपास करत आहे.
40 पेक्षा जास्त देशांमध्ये चीनचा स्पाय बलून
यूएस स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे की, आम्हाला माहिती आहे की पीआरसीने हे विविध देशांमधल्या घडामोडींवर पाळत ठेवणारे स्पाय बलून 5 खंडांमधील 40 पेक्षा जास्त देशांमध्ये पाठवले आहेत. बायडेन प्रशासन त्या 40 देशांशी थेट संपर्क साधून त्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्या कर्जाच्या जाळ्यात अडकवून चीनने आधीच आशिया आणि आफ्रिका खंडातील छोट्या मोठ्या देशांना आर्थिकदृष्ट्या बरबाद करून टाकले आहे. चिनी कर्जाचा विळखा सोडवताना बहुतांश देशांची पूर्ण दमछक झाली आहे. ते देश दिवाळखोरीत गेले आहेत. श्रीलंकेचे उदाहरण ताजे आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान त्याच वाटेने निघाले आहेत. आफ्रिकेतल्या देशातील आर्थिक अवस्थाही वेगळी नाही. या पार्श्वभूमीवर चीन स्पाय बलून पाठवून अनेक देशांवर देशांची हेरगिरी करून स्वतःचे भौगोलिक आणि आर्थिक वर्चस्व लादू पाहत असल्याचेही त्याच्या षड्यंत्रातून स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App