विशेष प्रतिनिधी
बीजिंग : वेईबो या सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून चीनमधील सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या बलशाली आघाडीकडून भारताच्या कोरोना हाताळणीची खिल्ली उडविण्यात आली आहे. China target Indias corona situation on social media
या अॅपवर एक पोस्ट टाकण्यात आली आहे. भारतामधील स्मशानभूमीतील सामुहिक अंत्यसंस्काराचे छायाचित्र त्यासाठी वापरले आले. त्याच्या बाजूला चीनने गेल्या आठवड्यात सोडलेल्या प्रक्षेपकाचे छायाचित्र जोडण्यात आले. त्यास देण्यात आलेल्या ओळी मानवतेवरील संकटाची कुचेष्टा करणाऱ्या होत्या. जेव्हा चीन एखादी गोष्ट प्रज्वलित करतो विरुद्ध भारत जेव्हा असे करतो असे त्याखाली नमूद करण्यात आले होते.
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय राजकीय आणि विधी व्यवहार आयोगाकडून त्यांच्या वेईबो अकाऊंटवर शनिवारी ही पोस्ट टाकण्यात आली. नंतर ती हटविण्यात आली. ही पोस्ट काही वेळात व्हायरल झाली. चीनमधील ऑनलाइन जगताचे वार्तांकन करणाऱ्या चायना डिजिटल टाईम्सनुसार चायनीज पोलिस ऑनलाइन, तियानजीन महापालिका सरकारी वकील कार्यालय अशा संस्थांच्या अधिकृत अकाउंटवरूनही खिल्ली उडविण्यात आली. त्यासाठी चीन फायर शाईन माऊंटन विरुद्ध भारतीय फायर शाईन माऊंटन असे शिर्षक देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App