China forcibly recruiting tibetian people in the army : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावानंतर आता चीनने आणखी एक नवीन पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने तिबेटसाठी एक विशेष कायदा आणला आहे. ज्याअंतर्गत भारताला लागून असलेल्या तिबेटच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या प्रत्येक घरातून 18 ते 40 वर्षे वयोगटातील एका व्यक्तीला चिनी मिलिशियामध्ये सामील होणे अनिवार्य असेल. जगात असे अनेक देश आहेत ज्यात सैन्यात भरती होणे अनिवार्य आहे. चीनदेखील त्या देशांपैकी एक आहे. China forcibly recruiting tibetian people in the army, training to deploy against India on LAC
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावानंतर आता चीनने आणखी एक नवीन पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने तिबेटसाठी एक विशेष कायदा आणला आहे. ज्याअंतर्गत भारताला लागून असलेल्या तिबेटच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या प्रत्येक घरातून 18 ते 40 वर्षे वयोगटातील एका व्यक्तीला चिनी मिलिशियामध्ये सामील होणे अनिवार्य असेल. जगात असे अनेक देश आहेत ज्यात सैन्यात भरती होणे अनिवार्य आहे. चीनदेखील त्या देशांपैकी एक आहे.
परंतु 1949 पासून ही सक्ती अंमलात आणली नव्हती आणि त्यामागील सर्वात मोठे कारण हे होते की, चीनचे तरुण स्वेच्छेने सैन्यात भरती होत होते. ज्यामुळे चिनी पीएलएची गरज भागवली जात होती. 18 वर्षांच्या वयानंतर चीनच्या प्रत्येक युवकाला लष्करी सेवांसाठी स्वतःची नोंदणी करावी लागते, परंतु सैन्यात भरती होणे आता आवश्यक नाही. आता चीनने पुन्हा सैन्यात भरती होणे बंधनकारक केले आहे. तथापि, हे बंधन चिनी नागरिकांवर नव्हे, तर केवळ तिबेटच्या तरुणांवर जबरदस्तीने लादले जात आहे.
सध्या डोकलामजवळच्या चुंबी व्हॅलीमध्ये मोठ्या संख्येने तरुणांची भरती करण्याचे काम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतीची प्रक्रिया यावर्षी ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 400 तरुणांच्या भरतीवर काम सुरू आहे. या भरतीनंतर सर्व तरुणांना एक वर्षासाठी ल्हासाजवळ प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर त्यांना भारत चीन सीमा LACवर तैनात केले जाईल. चिनी सैन्य तिबेटच्या पठारावर फार काळ टिकू शकत नाही. दुसरीकडे, तिबेटियन तरुण कठीण परिस्थितीतही चिनी सैन्याच्या वतीने अधिक चांगल्या पद्धतीने लढू शकतील, यामुळे ही भरती सुरू आहे.
China forcibly recruiting tibetian people in the army, training to deploy against India on LAC
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App