आतापर्यंत 3 लाख भाविकांनी घेतले दर्शन
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भक्त आतुर आहेत. पहिल्या दिवशी जवळजवळ तीन लाख भक्तांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले. उत्तर प्रदेश सरकारने ही माहिती दिली आहे. Chief Minister Yogi made an aerial inspection of the Ram temple
दर्शनासाठी मंदिरात पोहोचलेली गर्दी एवढी वाढली आहे की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनासह प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी मंदिरातच हजर आहेत. राम मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना, उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव, गृह, संजय प्रसाद आणि विशेष डीजी कायदा व सुव्यवस्था, प्रशांत कुमार भक्तांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिराच्या गर्भगृहात उपस्थित आहेत.
उत्तरप्रदेश प्रशासन स्वतः पुढाकार घेत लोकांना दर्शन देण्यात व्यस्त आहे. रामलल्लाचे दर्शन देण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन स्वतः मंदिरात उभे राहून लोकांना दर्शन घेऊ देत आहे.
याचबरोबर रामजन्मभूमीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः अयोध्येत पोहोचले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी हवाई सर्वेक्षण करून परिस्थितीची पाहणी केली. रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत आणि परिसरात मोठी गर्दी झाली आहे. गर्दी पाहून मंदिर व्यवस्थापनाने पंचक्रोशी परिक्रमा मार्गाजवळ सर्व वाहने थांबवली. एवढेच नाही तर दुपारी २ वाजेपर्यंत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App