काश्मीर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची कारगिल जवळ द्रास लष्करी तळाला भेट; वीर स्मृतीस्थळी अभिवादन


विशेष प्रतिनिधी

द्रास : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या काश्मीर दौऱ्यात विविध ठिकाणांना भेटी दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने शंकराचार्य मंदिर त्याचबरोबर कारगिल जवळील द्रास लष्करी तळाचा समावेश होता. Chief Minister visits Dras army base near Kargil during Kashmir tour

१९९९ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान करण्यात आलेल्या ऑपरेशन विजय मध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी विनम्र अभिवादन केले.

या वीरांच्या समरणार्थ तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन तिथे या युद्धाबाबत जतन करून ठेवलेल्या वस्तूंची तसेच तेव्हाच्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. या युद्धात भारतीय सैन्यदलाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून उंच डोंगरावर बसलेल्या शत्रूला परतवून लावण्यासाठी अतुलनीय शौर्य दाखवले होते. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर आपल्या सर्वांसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना प्रत्येक भारतीयाच्या वतीने मनोमन धन्यवाद दिले. यावेळी सरहद्द संस्थेचे प्रमुख संजय नहार तसेच सैन्यदलातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Chief Minister visits Dras army base near Kargil during Kashmir tour

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!