आज काँग्रेसने डाव्या आघाडीसोबत मिळून भारतात द्वेषाचे वातावरण बनवले आहे
विशेष प्रतिनिधी
पन्ना : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आता या निवडणुकीतही सनातनचा मुद्दा पुढे आला आहे. राज्यात रॅली काढताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हिमंता म्हणाले की, राहुल यांच्या पक्षाला सनातनला संपवायचे आहे. Chief Minister Himanta Sarma criticizes Rahul Gandhi over Sanatan dispute
हिमंता सरमा यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करताना म्हटले की, ”सनातनला कोणीही नष्ट करू शकत नाही. ते म्हणाले, मी राहुल गांधींना स्पष्ट सांगू इच्छितो की सनातन होते, सनातन आहे आणि सनातन राहणार. सनातनचा जगभर प्रसार करायचा आहे, हे आता आपण सर्व हिंदूंनी ठरवायचे आहे.”
मुख्यमंत्री हिमंता म्हणाले, ”राहुल गांधी म्हणतात की मी प्रेमाची दुकान चालवतो, तर मला सांगा की ज्यावेळी दिल्लीत शीखांचा कत्तल होत होती, त्यावेळी तुमचे प्रेमाचे दुकान कुठं होते. आज काँग्रेसने डाव्या आघाडीसोबत मिळून भारतात द्वेषाचे वातावरण बनवले आहे.”
देशाचा विकास झाला आहे, देशाचा मान वाढला आहे असे ते म्हणाले. आज स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नाला अनुसरून आपला देश जागतिक नेता होण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या वेळी होत आहेत. मध्य प्रदेशच्या निवडणुकीनंतर ३-४ महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका होणार असून देशात काय घडणार आहे, याची पार्श्वभूमी मध्य प्रदेशच्या निवडणुकांमुळे निर्माण होणार आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App