विश्वसुंदरी मानुषी छिल्लरचा लंडन मध्ये जलवा! फॅशन वीकमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व!


विशेष प्रतिनिधी

पुणे : 2017 ला मिस वर्ल्डचा किताब पटकावून संपूर्ण जगाचं लक्ष स्वतःहा कडे खेचणारी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सध्या भारतीय मनोरंजन विश्वात एक प्रसिद्ध चेहरा आहे. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या एका खास कारणांमुळे चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेत्री मानुषी लंडन फॅशन वीक 2023 मध्ये तिने पदार्पण केलं आहे. Miss World Manushi chhillar represent India in London Fashion Week

सगळ्या भारतीयांसाठी हि बाब नक्कीच अभिमानास्पद आहे.मानुषी छिल्लर म्हणते “जेव्हा आपण स्पर्धांमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण काय तयारी करावी आणि स्वतःला लोकांसमोर कसे सादर करावे यावर लक्ष केंद्रित करतो. पण जेव्हा स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाते जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व करताना येणारी जबाबदारी आणि अभिमान याची मला जाणीव आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

“मानुषी छिल्लरसाठी हा एक फॅशन वीक नसून भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची गोष्ट आहे. देशाची समृद्ध संस्कृती, विविधता आणि प्रतिभा जगासमोर दाखवण्याबद्दल मानुषी आग्रही आहे. राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आहे, जो मोठ्या जबाबदारीसह येतो असं मानुषीला वाटतं.मानुषी छिल्लरने सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या फॅशनने प्रेक्षकांना मोहित करत असून “द ग्रेट इंडियन फॅमिली ” या बहुप्रतिक्षित चित्रपटात विकी कौशलसोबत ती दिसणार आहे.

Miss World Manushi chhillar represent India in London Fashion Week

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात