‘मी भाजपविरोधात आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहे, पण काँग्रेस…’, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं विधान!


विरोध पक्षाच्या पाटणा बैठकीला दोन दिवसही होत नाही तोच आपसातच आरोप-प्रत्यारोप सुरू

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : बिहारच्या पाटणा येथे पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर अवघ्या दोनच दिवसांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि सीपीआयएमवर टीका केली आहे. केंद्रात भाजपाच्या विरोधात मोठी विरोधी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असतानाही, त्यांच्या(काँग्रेस आणि सीपीआयएम) कृतीमुळे अडथळे निर्माण होत आहेत. असं विधान ममता बॅनर्जींनी केल्याने विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना सुरुंग लागल्याचे दिसत आहे. Chief Minister Mamata Banerjee criticizes Congress and CPIM

वृत्तसंस्थेनुसार पीटीआय, कूचबिहारमध्ये सोमवारी (२६ जून) पंचायत निवडणूक रॅलीला संबोधित करताना, ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आम्ही केंद्रात भाजपाच्या विरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु बंगालमध्ये काँग्रेस आणि सीपीआयएम भाजपाच्या सोबत काम करण्याच्या प्रयत्नात आहेत. मी बंगालमधील अपवित्र युती तोडेन.’’

भाजपाशी गुप्त करार केल्याचा काँग्रेस आणि सीपीआयएमवर ममता बॅनर्जींनी आरोप करण्याची मागील दहा दिवसांमधील ही दुसरी वेळ आहे. ममता बॅनर्जींच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले, “भाजपाविरुद्धच्या लढाईत टीएमसीच्या विश्वासार्हतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिले आहे. भाजपा विरुद्धच्या लढाईत टीएमसीने एवढ्या वर्षात काय भूमिका बजावली हे आपल्या सर्वांना माहीत आहे.” तर अधीर रंजन चौधरींच्या सुरात  सूर मिळवत  सीपीआयएमने म्हटले आहे की,  भाजपाच्या विरोधात लढाई लढण्याच्या पद्धतीववर कम्युनिस्ट आणि काँग्रेसला लेक्चर देणारा शेवटचा व्यक्ती असायला हवा.

Chief Minister Mamata Banerjee criticizes Congress and CPIM

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात