मुख्यमंत्री धामी यांनी UCC बाबत दिली मोठी अपडेट; ‘या’ तारखेला मसुदा उपलब्ध होणार!

विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची तयारी सुरू


डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, समान नागरी संहितेसाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने मसुद्याचे काम पूर्ण केले आहे. मसुदा प्राप्त होताच, सरकार शक्य तितक्या लवकर विधानसभेचे अधिवेशन बोलावून संपूर्ण राज्यात समान नागरी संहिता लागू करेल.Chief Minister Dhami gave a major update on UCC The draft will be available on this date



प्रजासत्ताक दिनी दिलेल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिक, संविधान निर्माते यांना अभिवादन करून हा आपला संविधान बनवण्याचा सण असल्याचे म्हटले आहे. आपली ही अद्वितीय राज्यघटना देशाला सतत मार्गदर्शन करत आहे. संविधानानुसार, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत लोकशाही आदर्शांसाठी नेहमीच कटिबद्ध राहणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असं ते म्हणाले.

समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचा कार्यकाळ सरकारने १५ दिवसांनी वाढवला आहे. समितीने आपल्या शिफारशी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना लवकरात लवकर द्याव्यात अशी सरकारची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तज्ज्ञांची समिती हा मसुदा 2 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे.

Chief Minister Dhami gave a major update on UCC The draft will be available on this date

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात