शोध मोहीम सुरूच; चकमकीत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला
विशेष प्रतिनिधी
रायपूर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 18 नक्षलवादी ठार झाले आहेत. याशिवाय चकमकीत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. या चकमकीत तीन जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. या घटनेबाबत सांगितले जात आहे की, ही घटना कांकेरच्या छोटाबेटीया पोलीस स्टेशन हद्दीतील बिनागुंडा आणि कोरोनार दरम्यानच्या हापटोला जंगलात घडली.Chhattisgarh 18 naxalites including top commander killed in encounter many jawans injured
एनडीटीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार, चार एके-47 असॉल्ट रायफलही जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय २५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी कमांडर शंकर रावही या चकमकीत मारला गेला.
एडीजी नक्षल ऑपरेशन्स विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, चकमकीत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. मात्र, ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जखमी जवानांची प्रकृती सामान्य असून धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जखमी जवानांवर चांगल्या उपचारांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. यासोबतच परिसरात शोधमोहीम सुरू आहे. ही घटना दुपारी दोन वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App