या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 एप्रिल रोजी होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: स्वामी रामदेव यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पतंजली जाहिरात प्रकरणी योगगुरू स्वामी रामदेव यांच्या माफीनाम्यावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण सुप्रीम कोर्टात उपस्थित होते. रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात वैयक्तिक माफी मागितली.Baba Ramdev said in the Supreme Court I am ready to apologize publicly
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर पतंजली प्रकरणाची सुनावणी झाली. रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल वृत्तपत्रात जाहीर माफी मागण्याचा प्रस्ताव दिला. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीची माफी अद्याप स्वीकारली नसल्याचे स्पष्ट केले.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हेमा कोहली यांनी स्वामी रामदेव यांना सांगितले की, तुम्ही लोकप्रिय आहात. तुम्ही योग क्षेत्रात खूप काम केले आहे. तुम्ही व्यवसायही करू लागलात. सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना माफी का द्यावी, असा थेट सवाल केला, यावर स्वामी रामदेव यांनी न्यायालयाला सांगितले की, मी आतापासून सावध राहीन, माझ्याशी करोडो लोक जोडले गेले आहेत. न्यायालयाने कडक शब्दात टिपण्णी करत म्हटले की, ‘आमच्या आदेशानंतर तुम्ही हे सर्व केले. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही असाध्य रोगांची जाहिरात करू शकत नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे.
रामदेव यांनी कोर्टात माफी मागितली तेव्हा न्यायमूर्ती कोहली यांनी रामदेव यांना फटकारले आणि तुम्ही आज माफी मागत आहात, असे होत नाही, असे सांगितले. तुमचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे, तुमची माफी स्वीकारली जावी की नाही याचा आम्ही विचार करू. तुम्ही न्यायालयाच्या आदेशांचे सातत्याने उल्लंघन केले आहे. न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले की, तुम्ही मनापासून माफी मागत नाही आहात. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 एप्रिल रोजी होणार आहे. रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून माफी मिळते की नाही, हे त्याच दिवशी ठरवले जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App