नाशकातून माघार घेताना भुजबळांची कारणे वेगळी; पण ही तर खरी हिंदुत्ववादी मतदारांची सरशी!!

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेताना छगन भुजबळ यांनी जी कारणे दिली, ती वेगळी असली तरी प्रत्यक्षात ही तर खरी नाशिक मधल्या हिंदुत्ववादी मतदारांची सरशी आहे. नाशिक मधल्या हिंदुत्ववादी मतदारांचा दबाव महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांना मान्य करावा लागला आहे. Chagan bhujbal withdrew his candidataure from nashik, victory for hindutva voters in nashik!!

महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी हाय प्रोफाईल मतदारसंघ नाशिक मधली महायुतीची उमेदवारी शिवसेना – भाजप आणि राष्ट्रवादी या तीन प्रबळ पक्षाच्या दाव्यांमध्ये अडकली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर होऊन त्यांच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली, पण महायुतीचे काही ठरेनासेच झाले होते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख अजय बोरस्ते, भाजपचे तीनही आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले हे आपापल्या नेतृत्वांकडे पक्षाच्या उमेदवारीसाठी हट्ट धरून बसले होते, तर तिकडे अजित पवार हे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी हट्ट करून बसले होते. परंतु हा तिढा राज्य पातळीवर सुटायला तयार नव्हता.

पण आज छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःहून नाशिकच्या शर्यतीतून माघार घेतली. नाशिक लोकसभा मतदारसंघात आपण उमेदवारी करावी, अशी सूचना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केली होती. त्याची माहिती होळीच्या दरम्यानच अजित पवारांनी आपल्याला दिली होती. त्यामुळे आपण नाशिक मतदार संघातून तयारी सुरू केली होती. पण या मतदारसंघाचा महायुतीतला तिढा सुटायला तयार नाही म्हणून मी स्वतःहून माघार घेत आहे, असा दावा छगन भुजबळ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.

छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, पण राष्ट्रवादीच्या कोट्यातून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मिळालेले मंत्रिपद मात्र सोडलेले नाही.

आपल्या उमेदवारीसाठी खुद्द पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आग्रही होते, असा दावा जरी भुजबळ यांनी केला असला तरी, नाशिक मधली स्थानिक पातळीवरची वस्तुस्थिती पूर्ण वेगळी होती आणि आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातले तीन विधानसभा मतदारसंघ तर भाजपकडे आहेत. सिन्नर सारखा मतदार संघ हा राष्ट्रवादीकडे असला, तरी तिथला मतदार भाजपकडे झुकला आहे, अशा स्थितीत भुजबळांची उमेदवारी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लादणे ही बाब तितकीशी नाशिकच्या मतदारांना रुचणारी आणि पचणारी नव्हती. मग भले छगन भुजबळांची उमेदवारी स्वतः मोदी किंवा अमित शहा यांनी पुढे रेटली असती, तरी नाशिक शहरातल्या मतदारांना प्रत्यक्ष घराबाहेर काढून मतदान केंद्रावर आणून मतदान करून घेण्याचे फार मोठे आव्हान छगन भुजबळांपुढे होते. ते छगन भुजबळांच्या आवाक्या बाहेरचे होते.

हिंदू देवतांचा अपमान करणे पडले महागात

पण याला कारणीभूत ठरले ते मोदी किंवा शाह नव्हे, तर याला कारणीभूत ठरला तो छगन भुजबळांचा गेल्या काही वर्षांमधला राजकीय वक्तव्यांचा इतिहास. छगन भुजबळ यांनी आपली ओबीसी व्होट बँक पक्की करण्याच्या नादात पुरोगामी भूमिका अधोरेखित करताना अतिरेक केला होता. देवी सरस्वतीला देखील त्यांनी अवमानित केले होते. नाशिकच्या हिंदुत्ववादी मतदारांना भुजबळांची ही मते रुचणे आणि पचणे शक्यच नव्हते. तशी ती रुचली आणि पचली देखील नाहीत. त्यामुळेच छगन भुजबळांच्या उमेदवारीला नाशिकमधून फार मोठा विरोध होता. त्यात मराठा संघटना आणि ब्राह्मण संघटना यांच्या उघड विरोधाची भर पडली होती. त्यामुळे राजाभाऊ वाजे यांचे नाशिक मध्ये सुरवातीला नगण्य वाटणारे आव्हान हे मोठे ठरताना दिसत होते. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी माघार घेणे अपरिहार्य होते.

छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. राजकारणाचा त्यांना शिवसेना ते राष्ट्रवादी असा प्रचंड अनुभव आहे, पण कुठलीही पुरोगामी भूमिका पुढे रेटताना फार मोठ्या जनसमुहाच्या भावना भेदून चालत नाहीत आणि दुखावून देखील चालत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले नाही… आणि यातच त्यांच्या नाशिक मधल्या माघारीची खरी राजकीय आणि सामाजिक बीजे दडली आहेत. जी कदाचित छगन भुजबळ उघडपणे मान्य करणार नाही पण म्हणून वस्तुस्थिती लपत नाही.

छगन भुजबळांनी किंवा अगदी भाजपच्या अतिवरिष्ठ नेतृत्वाने त्यांची उमेदवारी नाशिकवर लादली असती, तरी नाशिक मधल्या हिंदुत्वनिष्ठ मतदाराला घराबाहेर काढून त्याला मतदान केंद्रापर्यंत आणून त्याचे अनुकूल मतदान करवून घेण्याची “किमया” भुजबळांची उमेदवारी लादणाऱ्यांना देखील साध्य करता आली नसती, ही यातली अधोरेखित वस्तूस्थिती आहे!!

Chagan bhujbal withdrew his candidataure from nashik, victory for hindutva voters in nashik!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात