विशेष प्रतिनिधी
पुणे : सून म्हणतात बाहेरची पण शरद पवारांना आता चिंता बालक रामाशेजारी नसलेल्या सीतामाईची!!, ही वस्तुस्थिती आज खुद्द शरद पवारांच्याच वक्तव्यातून समोर आली. Sharad pawar makes new controversial statement over ram mandir and Balak ram and sitamai
शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना बाहेरून आलेली पवार असे म्हणून हिणवले. सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू आले. अजित पवार संतापले. सून घरात येऊन 40 वर्षे झाली तरी वडीलधारे तिला बाहेरची म्हणणार का??, त्यांच्या अशा बोलण्याने तळपायाची आग मस्तकाला जाते असे संतप्त उद्गार अजितदादांनी काढले. त्यावर शरद पवार ते वाक्य सहज बोलून गेले, असे खुलासे करत सुप्रिया सुळे सुटल्या!!
पण “बाहेरून आलेली पवार” हा वाद अजून मिटला नाही, तोच पवारांनी आपल्या शैलीत “चाणक्य डाव” खेळत नवा वाद सुरू केला. पवारांना आता अयोध्येतल्या राम मंदिरात बालक रामाच्या मूर्ती शेजारी सीतामाईची मूर्ती नसल्याची “चिंता” निर्माण झाली आहे. ती “चिंता” सुद्धा त्यांना स्वतःहून निर्माण झालेली नाही, तर त्यांना म्हणे एका सभेत काही महिला भेटायला आल्या आणि त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
ज्या बालक रामाची मूर्ती अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिरात आहे, ती 5 वर्षांचा राम असे गृहीत धरून केली आहे, इतकेच नाही तर ते मूळात अयोध्येतले राम जन्मभूमी मंदिर आहे मग तिथे सीतामाईची मूर्ती कशी असेल??, हा साधा प्रश्नही पवारांना भेटलेल्या महिलांना पडू नये की पवारांना खरंच त्या महिला भेटल्या होत्या का??, की प्रत्यक्षात भेटल्या नसलेल्या महिलांच्या नावावर पवारांनी स्वतःचे सीतामाई नसल्याचे मत रेटून मांडले आहे??, असे एकापाठोपाठ एक सवाल तयार होत आहे.
खुद्द शरद पवारांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निर्माण होते. परंतु आपण मंदिरांच्या कार्यक्रमांना सहसा जात नाही, असे सांगून पवारांनी अयोध्येत जाण्याचे टाळले होते. तसेही मंदिरांमध्ये जाण्याच्या फंदात पवार पडल्याचे फारसे कधी आढळले नाही. कारण ते “पुरोगामी” आहेत. मांसाहार केला म्हणून ते दगडूशेठ मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेऊन निघून गेले होते. पण आता त्यांना अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिरात बालक रामांच्या मूर्ती शेजारी सीतामाई नसल्याची चिंता निर्माण झाली आहे.
इतकेच नाही, तर आता अयोध्या राम मंदिराचा मुद्दा संपला. लोकसभा निवडणुकीत त्या मुद्द्याची कोणी चर्चाही करत नसल्याचा दावाही या निमित्ताने त्यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more