वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपायांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबतचे एक पत्र पाठविले असून त्यात त्यांनी विमानतळांवरील चाचण्यांमध्ये कोठेही हयगय केली जाऊ नये असे म्हटले आहे. Central govt. takes steps against corona
परकी प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जावे तसेच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निकषांनुसार त्यांच्या चाचण्या घेण्यात याव्यात. ज्या प्रवाशांचे अहवाल हे पॉझिटिव्ह येतील त्यांचे नमुने हे तातडीने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात यावेत, असेही या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
जगात ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होत असल्याने केंद्र सरकार सावध झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. हा व्हेरिएंट ‘आरटी- पीसीआर’ आणि ‘रॅट’ सारख्या चाचण्यांना चकवा देऊ शकत नाही. आगामी संसर्गाचा सामना करण्यासाठी राज्यांनी पुरेशाप्रमाणात पायाभूत सेवांची उभारणी करावी तसेच घरगुती विलगीकरणात असलेल्यांवर देखील बारकाईने लक्ष ठेवावे, असेही नव्या निर्देशांत नमूद करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App