केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना मिळणार १० जानेवारीपासून बूस्टर डोस


  • बूस्टर किंवा प्रीकॉशन डोस सीआरपीएफ जवानांच्या दृष्टीने अधिक महत्वाचा मानला जात आहे. Central Armed Police Force personnel will get booster dose from January 10

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आता लवकरच पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्याच पार्श्‍वभूमीवर, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत समावेश करून निवडणूक कर्मचाऱ्यांनाही बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.निवडणुकांवेळीही सीआरपीएफचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले जातात.
दरम्यान केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) जवानांचा समावेश फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे त्या जवानांनाही १० जानेवारीपासून करोनालसींचे बूस्टर डोस मिळणार आहेत.



केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB)ही केंद्रीय सशस्त्र दले आहेत.त्या दलांचे जवानही तिसऱ्या डोससाठी पात्र आहेत.बूस्टर किंवा प्रीकॉशन डोस सीआरपीएफ जवानांच्या दृष्टीने अधिक महत्वाचा मानला जात आहे.त्या दलावर देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे.

Central Armed Police Force personnel will get booster dose from January 10

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात