फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर ; पत्नी फेड्रिक सिद्दीकीने स्वीकारला पुरस्कार


  • दानिश सिद्दीकी म्हणजे एक जादुई डोळ्याचं व्यक्तीमत्व होतं. सध्याच्या काळातील त्यांना एक अग्रणीचे पत्रकार मानले जात. Photojournalist Danish Siddiqui posthumously awarded Red Ink ‘Journalist of the Year’ award; Wife Frederick Siddiqui accepts the award

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रॉयटर्ससाठी अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करायला गेलेले भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची 16 जुलैला तालिबान या दहशतवादी गटाकडून हत्या करण्यात आली होती.दरम्यान फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मुंबई प्रेस क्लबच्या वतीनं प्रतिष्ठेचा मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.



भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या हस्ते या वर्षीचा रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ दानिश सिद्दीकी यांच्या पत्नी फेड्रिक सिद्दीकी यांनी स्वीकारला आहे.दरम्यान हा पुरस्कार प्रदान करताना सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले की, “दानिश सिद्दीकी म्हणजे एक जादुई डोळ्याचं व्यक्तीमत्व होतं. सध्याच्या काळातील त्यांना एक अग्रणीचे पत्रकार मानले जात. जर एखादी घटना एक हजार शब्दात सांगायची असेल तर त्यासाठी दानिश सिद्दीकी यांचा एक फोटो माहितीसाठी खूप असायचा.”

Photojournalist Danish Siddiqui posthumously awarded Red Ink ‘Journalist of the Year’ award; Wife Frederick Siddiqui accepts the award

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात