सिमकार्ड विक्रेत्यांना केंद्राची कठोर नियमावली, ग्राहकांना केवायसी अनिवार्य, उल्लंघन केले तर वितरकांना 10 लाखांचा होणार दंड


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बनावटगिरी आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सिमकार्ड विक्रेत्यांसाठी कडक नियमावली तयार केली आहे. यापुढे सिमकार्ड डीलर्सना पोलिसांकडून पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच दूरसंचार विभागाने घाऊक कनेक्शनची तरतूद बंद केली आहे. त्याऐवजी व्यावसायिक कनेक्शनची नवीन संकल्पना सादर केली जाईल. व्यवसाय आणि सिम घेणाऱ्या ग्राहकांचे केवायसीदेखील केले जाईल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. देशात 10 लाख सिमकार्ड डीलर आहेत. त्यांना पोलिस पडताळणीसाठी वेळ दिला जाईल. नियमांचे उल्लंघन केल्यास व्यापाऱ्यांना 10 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.Center’s strict rules for sim card sellers, KYC mandatory for customers, distributors will be fined 10 lakhs if violated



67 हजार वितरकांना टाकले काळ्या यादीत

केंद्र सरकारने 52 लाख मोबाइल कनेक्शन तोडले आहेत, तर 67 हजार डीलर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मे 2023 पासून सिमकार्ड विक्रेत्यांविरोधात 300 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. फसवणूक करणारी 66 हजार खाती व्हॉट्सअॅपनेच ब्लॉक केली आहेत.

Center’s strict rules for sim card sellers, KYC mandatory for customers, distributors will be fined 10 lakhs if violated

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!