CDS Helicopter Crash : राजनाथ सिंह ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलले, प्रकृती सध्या चिंताजनक


हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर बंगळुरू येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचवेळी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॅप्टनच्या कुटुंबीयांशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. CDS Helicopter Crash Rajnath Singh spoke to the family of Group Captain Varun Singh on the phone, the condition is critical now


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर बंगळुरू येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचवेळी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॅप्टनच्या कुटुंबीयांशी फोनवर चर्चा केली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वरुण सिंह यांच्या कुटुंबीयांना सांगितले की, देश प्रत्येक प्रकारे मदत करण्यास तयार आहे. तसेच वरुण यांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा देण्यात येत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर वरुण यांच्या उपचाराबद्दल कुटुंबीयांनीही समाधान व्यक्त केले आहे. कामन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वरुण यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची प्रकृती पाहता एक विशेष पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी सांगितले की, आदल्या दिवशी त्यांचे डायलिसिस झाले होते तसेच त्यांचा बीपी नियंत्रणात आला आहे.

अपघातात 13 जणांचा मृत्यू

बुधवारी झालेल्या अपघातात गंभीररीत्या जळालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण यांना वेलिंग्टन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना प्रथम रस्त्याने रुग्णवाहिकेतून सुलूर आणि नंतर बंगळुरू येथे चांगल्या उपचारासाठी नेण्यात आले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि इतर 11 लष्करी जवान बुधवारी कुन्नूरजवळ एमआय-17V5 हेलिकॉप्टर कोसळून ठार झाले. या अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हा एकमेव बचावले आहेत.वरुण सिंग यांना शौर्य चक्र प्रदान

ग्रुप कॅप्टन सिंग यांना तेजस फायटर जेटला संभाव्य अपघातातून गेल्या वर्षी एका मोठ्या तांत्रिक अडचणीमुळे यशस्वीरीत्या वाचवल्याबद्दल ऑगस्टमध्ये शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले होते. दुसरीकडे, देशातील पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत पंचतत्त्वात विलीन झाले आहेत. दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत त्यांना लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आला. बिपिन रावत आणि मधुलिका रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांनी त्यांच्या आई-वडिलांवर अंत्यसंस्कार केले. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अंत्यदर्शनासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, इतर देशांतील अधिकारी यांच्यासह अनेक व्हीआयपी स्मशानभूमीत पोहोचले होते.

CDS Helicopter Crash Rajnath Singh spoke to the family of Group Captain Varun Singh on the phone, the condition is critical now

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात