Rajasthan : नितीश – लालूंच्या पावलावर अशोक गेहलोतांचे पाऊल; राजस्थानातही बिहारसारखे जातनिहाय सर्वेक्षण!!

Caste wise survey

वृत्तसंस्था

जयपूर : बिहारमध्ये नितीश कुमार – लालूप्रसाद यांच्या सरकारने जातनिहाय सर्वेक्षण केले, पण त्याला जातनिहाय जनगणना असे म्हटले. वास्तविक कोणतीही जनगणना फक्त केंद्र सरकार करू शकते. राज्य सरकार जनगणना करू शकत नाही. राज्य सरकार करते, ते सर्वेक्षण असते. ते जातनिहाय सर्वेक्षण बिहारमध्ये सरकारने केले. आता राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तशाच प्रकारच्या जातनिहाय सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. Caste wise survey like Bihar in Rajasthan

केंद्रातील मोदी सरकारने 33 % महिला आरक्षण विधेयक नव्या संस्थेत मंजूर करून घेतल्यानंतर भाजपच्या हातात महिला कल्याणाचा फार मोठा राजकीय आणि सामाजिक मुद्दा हाती आल्यानंतर आपल्या हाती कोणताही तसा मुद्दा उरत नाही हे लक्षात येताच नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांच्या सरकारने बिहारमध्ये जातीचा मुद्दा पुढे केला आणि त्याला सकारात्मक मुलामा देत जातनिहाय सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणालाच त्यांनी जातनिहाय जनगणनेचे नाव दिले.

नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव या दोघांचेही पक्ष प्रादेशिक आहेत आणि जातनिहाय सर्वेक्षण हा प्रादेशिक पक्षांचा प्रमुख मुद्दा आहे, पण त्याचा काही राजकीय लाभ प्रादेशिक पक्षांना मिळाला, तर आपल्या राजकीय लाभात घट होईल, अशी भीती काँग्रेसला वाटल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जितनी आबादी उतनी हिस्सेदारी अशी नवी घोषणा देत काँग्रेसलाही जातीच्या राजकारणाचे वळण देण्याचा प्रयत्न केला.

आता याच जातीच्या राजकारणाच्या वळणातून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानत जातनिहाय सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. ती घोषणा करताना देखील त्यांनी राहुल गांधींच्याच घोषणेची री ओढली. राजस्थानात जातनिहाय जनगणना करून आम्ही सामाजिक न्याय प्रस्थापित करू, असा दावा अशोक गेहलोत यांनी केला.

पण राजस्थान विधानसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जातनिहाय सर्वेक्षण लगेच सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे ते काँग्रेससाठी निवडणुकीचे आश्वासन ठरणार आहे. पण प्रत्यक्षात अशोक गेहलोत यांनी मात्र त्याला आश्वासन असे म्हटले नसून जातनिहाय जनगणनेचा सरकारने निर्णय घेतल्याचा दावा केला आहे.

Caste wise survey like Bihar in Rajasthan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात