जाता जाता कॅप्टन साहेबांचा तडाखा; म्हणाले,सिध्दूंना पाकचा पाठिंबा व त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – ज्या नवज्योत सिंग सिध्दू यांच्या नादी लागून काँग्रेस श्रेष्ठींनी पंजाबमध्ये नेतृत्व बदलाचा घाट घातला, त्या नवज्योत सिंग सिध्दू यांना मावळते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जाता जाता त़डाखा दिला आहे.Captain Saheb’s slap on the go; Said, Pakistan’s support to Navjot Singh Sidhu

नवज्योत सिंग सिध्दू यांना पाकिस्तानचा पाठिंबा आहे, असे विधान करून कॅप्टन साहेबांनी सिध्दूंच्या मुख्यमंत्रीपदाच्या मार्गात आणखी काटे पसरवून ठेवले आहेत.काँग्रेस श्रेष्ठींवर देखील त्यांनी एका पाठोपाठ एक आरोप लावले आहेतच. पण नवज्योत सिंग सिध्दू यांच्या नेतृत्वाभोवती पाकिस्तान धार्जिण्या वृत्तीच्या संशयाचे जाळे पसरवून ठेवले आहे.



सिध्दू पंजाबसाठी धोकादायक आहे. कारण आपण विरोध करीत असताना देखील ते पाकिस्तानात इम्रान खान यांच्या शपथविधीला गेले. सीमेवर आपले जवान मरत असताना पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर बाज्वांना मिठ्या मारल्या. मी भारतीय सैन्याच्या सेवेत राहिलेला अधिकारी आहे. मी सहन करू शकत नाही, असा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा देऊन काँग्रेस श्रेष्ठींना एक प्रकारे पेचात टाकले आहे.

मुख्यमंत्री निवडीचे अधिकार सोनिया गांधींना देण्याचे दोन ठराव काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत. हा काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे. पण आता नवज्योत सिंग सिध्दू यांना नवा मुख्यमंत्री नेमताना काँग्रेस श्रेष्ठींना अनेक वेळा विचार करावा लागेल. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या भोवती पाकिस्तानी धार्जिण्या वृत्तीचा आरोप लावून संशयाचे दाट जाळे पसरवून ठेवले आहे.

Captain Saheb’s slap on the go; Said, Pakistan’s support to Navjot Singh Sidhu

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात