विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कॅलिकत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता हुंडा घेणार नसल्याचे घोषणापत्र लिहून द्यावे लागणार आहे. हा बॉंड लिहून देणे अनिवार्य असणार आहे. असे न केल्यास विद्यापीठातील प्रवेश रद्द होणे, पदवी न देणे किंवा पदवी काढून घेणे असे परिणाम भोगावे लागतील.
Calicut university: Anti-Dowry bond must be signed before admissions in UG PG courses
केरळमधील सर्वात मोठे विद्यापीठ असलेल्या कालिकत विद्यापीठाने, जे विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्या प्रवेशासाठी पूर्व तयारीतील अट म्हणून विवाहाच्या वेळी हुंडा घेणार अथवा देणार नसल्याचे लिहून द्यावे लागणार आहे. विद्यापीठाने सर्व प्राचार्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. स्टेट गवर्नर अली मोहम्मद खान यांनी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांकडून हुंडा देणे घेणे बाबत हमीपत्र घ्यावे असे सुचवल्यानंतर हे पाऊल उचलले गेले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवईंच्या कन्येचा हुंड्यासाठी छळ, नागपुरात पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अलीकडच्या काळात राज्यामध्ये हुंडाबळीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे व कायद्याचे उल्लंघन होत आहे. सदरच्या हमीपत्रात विद्यार्थ्याने हुंडा घेतल्यास दिलेली पदवी काढून घेण्याचाही उल्लेख आहे.
सरकारने सूचना दिली आहे की, हुंडा न घेणे अथवा न देणे तसेच, हुंडा देण्यासाठी प्रवृत्त करण्याचे डिक्लेरेशन विहीत नमुन्यामध्ये विद्यार्थी व पालकाकडून प्रवेशाच्यावेळी घेणे अनिवार्य केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी आधीच प्रवेश घेतला आहे त्यांनाही ही अट लागू होणार आहे. याचा मसुदा साधारण असा आहे की, विद्यार्थ्यांनी हुंडा घेणे अथवा हुंडा घेण्यास प्रवृत्त करणे याबाबतचे नियम व कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ज्यामध्ये प्रवेश रद्द होणे, पदवी न देणे व पदवी काढून घेतली जाणे याचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App