विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिध्दू यांच्यातील वाद शमण्याची इच्छा नाही. कॅ. अमरिंदरसिंग यांनी कॉँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे सिध्दू यांची तक्रार केली आहे. सिध्दू यांचा इतका अक्कडबाजपणा चांगला नाही असे त्यांनी म्हटले आहे. Ca. Amarinder Singh complains to Sonia Gandhi about Navjot Sidhu, says arrogance is not good
कॅ. अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांच्याशी राज्यातील परिस्थितीबाबत सुमारे तासभर चर्चा केली. यावेळी कॉँग्रेसचे पंजाब प्रभारी हरिष रावतही उपस्थित होते. यावेळी अमरिंदर सिंग यांनी सिध्दू यांच्या अनेक तक्रारी केल्या. त्यांच्याकडून आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका करण्यात येत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
पंजाब कॉँग्रेसमध्ये कॅ. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिध्दू यांच्यात वाद आहे. त्यातूनच सिध्दू यांनी त्यांच्यावर जाहीर टीका केली होती. सिध्दू यांच्या गटातील अनेक आमदारांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर सिध्दू यांनी सूचकपणे आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची धमकी दिली होती. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी सिध्दू यांची पंजाब कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर सिध्दू कॅ.अमरिंदर सिंग यांच्याविरुध्दच आक्रमक झाले आहेत.
पंजाबमधील ड्रगच्या व्यापाराविरुध्द एल्गार पुकारत त्यांनी कॉँग्रेसच्या सरकारलाच आव्हान दिले आहे. २०१७ च्या निवडणुकीत कॅ. अमरिंदर सिंग हे हाता गुटख्याची पुडी घेऊन ड्रगचा धंदा राज्यातून हद्दपार करू असे म्हणत होते. गेल्या चार वर्षांत ड्रगविरुध्द काय कारवाई केली असा सवाल सिध्दू करत आहेत. त्यामुळे अमरिंदर सिंग हे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी सुमारे तासभर सोनिया गांधी यांची भेट घेतली. यामध्ये सिध्दू यांच्याविरुध्द अनेक तक्रारी केल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App