वृत्तसंस्था
नवी दिल्ली : फास्टॅगला आता बायबाय करून थेट जीपीएसद्वारे टोल कापण्याची नवी प्रणाली लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. टोल वसुलीवरून होणारे वाद या माध्यमातून कायमचे निकालात काढण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. Bye bye to Fastag now; Via GPS A new system of toll collection will be implemented
टोल वसुलीमुळे नाक्यावरील लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच फास्टॅग नसल्याने दुप्पट टोल आणि त्यानंतर होणारे वाद ही नवी डोकेदुखी ठरत आहे. वाद आणि भांडणं बंद करण्यासाठी केंद्र सरकार आता नवीन प्रणाली आणणार आहे.
लाखो वाहनांमध्ये लावलेले फास्टॅग काढून टाकण्याची शिफारस संसदीय समितीने केली. लवकरच वाहनांचा टोल हा थेट बँक खात्यातून जीपीएसद्वारे वसूल केला जाईल. फास्टॅगचे ऑनलाइन रिचार्ज करण्यासाठी तंत्रज्ञानात पारंगत नसलेल्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल, असे समितीचे म्हणणे आहे. या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे.
संसदेच्या परिवहन आणि पर्यटनविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष टीजी व्यंकटेश यांनी संसदेत राष्ट्र उभारणीत महामार्गांच्या भूमिकेवर बुधवारी अहवाल सादर केला. यामध्ये टोल वसुलीसाठी जीपीएस आधारित प्रणाली कार्यान्वित करणार असल्याचे नमूद केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App