यमुना फेब्रुवारी २०२५ पर्यंत स्वच्छ करून नदीत आंघोळ करणार, अरविंद केजरीवाल म्हणाले ७० वर्षांची घाण दोन दिवसांत तर दूर करता येणार नाही

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गेल्या ७० वर्षांतील घाण दोन दिवसांत तर स्वच्छ करता येणार नाही. मात्र, मी वचन दिल्याप्रमाणे फेब्रुवारी २०२५ पर्यंत यमुना नदी स्वच्छ करेल. यमुना स्वच्छ करण्यासाठी दिल्ली सरकार सहा कलमी कृती योजनेवर युद्धपातळीवर काम करीत आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.By February 2025 Yamuna to be cleaned and I will bathed in river : Arvind Kejriwal

केजरीवाल म्हणाले, यमुना नदी एवढी प्रदूषित व्हायला ७० वर्षे लागली. या ७० वर्षांतील नुकसानाची भरपाई दोन दिवसांत करता येऊ शकत नाही. मी वायदा केला होता, विधानसभेच्या आगामी निवडणुकीपर्यंत यमुना स्वच्छ करीन.



सर्वांसोबत यमुनेत स्नान करीन. यमुना स्वच्छ करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करीत आहोत. यासाठी सहा कलमी कृती योजना आखली आहे. मी स्वत: लक्ष देत आहे.यमुनेत नजफगढ, बादशाहपूर, सप्लिमेंटरी आणि गाजिपूरमधून सांडपाणी येते. तेथे त्यावर प्रक्रिया केली जात आहे.

औद्योगिक घाण पाणी यमुनेत सोडणारे उद्योग सरकार बंद करील. सांडपाणी वाहून नेण्याची सोय असलेल्या भागातील घरांना सरकार जोडणी देईल. ही सहा कलमी कृती योजना लागू करून फेब्रुवारी २०२५ पर्यंत यमुना स्वच्छ करू, अशी आशा आमचे अभियंता आणि अधिकाऱ्यांना आहे.

By February 2025 Yamuna to be cleaned and I will bathed in river : Arvind Kejriwal

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात