वृत्तसंस्था
हैदराबाद : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी आमदार के. कविता (46) यांना शुक्रवारी हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. तपास यंत्रणा त्यांना चौकशीसाठी दिल्लीला घेऊन जात आहे. BRS leader Kavita finally arrested; ED action after 8-hour raid in Hyderabad
यापूर्वी, ईडीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता हैदराबादमधील बीआरएस नेत्या कविता यांच्या घरावर छापा टाकला होता. सुमारे 8 तासांच्या शोध आणि कारवाईनंतर त्यांना सायंकाळी 7 वाजता प्रथम ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
कवितांचे दिल्लीचे तिकीट आगाऊ बुक केले होते
बीआरएस नेते माजी मंत्री प्रशांत रेड्डी म्हणाले की, कवितांच्या अटकेनंतर ईडी कवितांना दिल्लीला घेऊन जात आहे. टीमने आम्हाला सांगितले होते की कवितांना सकाळी 8.45 च्या फ्लाइटने दिल्लीला नेण्यात येईल. कवितांना अटक करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. तिकीटही काढले होते.
कविता यांनी तपास यंत्रणेच्या अनेक समन्सकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या (MLC) सदस्य आहेत आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत.
आरोपी अमित अरोराने घेतले होते कवितांचे नाव
मार्च 2023 मध्ये, ED ने दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात के. कविता यांचे नाव देखील समाविष्ट केले होते. ईडीने तपासासंदर्भात काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली होती. त्यात कवितांचेही नाव होते. ‘आप’च्या नेत्यांना 100 कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर कविता यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, निवडणूक राज्यांमध्ये ईडी पंतप्रधान मोदींच्या आधी पोहोचते.
ईडीने व्यापारी अमित अरोरा यांना गुरुग्राममधून अटक केली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, अमित अरोरा यांनी आपल्या जबाबात टीआरएस नेत्यांचे नाव उघड केले होते. एजन्सीने दावा केला होता की कविता या ‘साउथ ग्रुप’ नावाच्या मद्य लॉबीची प्रमुख नेता होत्या. त्यांनी दिल्लीतील आप सरकारच्या नेत्यांना इतर उद्योगपतींमार्फत 100 कोटी रुपये दिले.
ईडीने हैदराबादचे व्यापारी अरुण रामचंद्रन पिल्लई यांना ताब्यात घेतले होते. अरुण हे के कविता यांच्या जवळचे मानले जातात. पिल्लई यांच्यावर मद्य धोरणात बदल करण्यासाठी 100 कोटी रुपये आम आदमी पार्टीला पाठवल्याचा आरोप आहे. आणखी एक मद्य व्यावसायिक अमनदीप ढाल यांनाही ईडीच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App