वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समिती (BRS) नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. दिल्ली दारू धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने त्यांना 15 मार्च रोजी अटक केली होती.BRS leader K. Hearing on Kavita’s bail application today; Tihar Jail in Delhi Liquor Policy Case
कविता 23 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत होत्या. 26 मार्च रोजी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने त्यांना 9 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून कविता तिहार तुरुंगात आहे. आपल्या अल्पवयीन मुलाच्या परीक्षेचे कारण देत त्यांनी अंतरिम जामीन मागितला होता.
न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी 1 एप्रिलची तारीख निश्चित केली होती. ईडीने मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये नियमांचा हवाला देत त्यांच्या याचिकेला विरोध केला होता.
यापूर्वी 22 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने कविता यांना जामीन देण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते.
दिल्ली दारू घोटाळ्यात कविता यांचं नाव कधी आलं?
दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी ED ने 30 नोव्हेंबर 2022 रोजी गुरुग्राममधून व्यापारी अमित अरोरा याला अटक केली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार, अमितने आपल्या वक्तव्यात टीआरएस नेत्या के. कविता यांचं नाव घेतलं होतं.
कविता ‘साउथ ग्रुप’ नावाच्या मद्य लॉबीची प्रमुख नेत्या असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला होता. त्यांनी विजय नायर यांच्यामार्फत दिल्लीतील आप सरकारच्या नेत्यांना 100 कोटी रुपये दिले होते. गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने हा पैसा वापरला.
फेब्रुवारी 2023 मध्ये सीबीआयने कविता यांचे अकाउंटंट बुचीबाबू गोरंटला यांना अटक केली. ईडीने बुचीबाबूचीही चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने हैदराबादचे व्यापारी अरुण रामचंद्रन पिल्लई यांना 7 मार्च 2023 रोजी अटक केली.
कविता आणि आम आदमी पार्टीमध्ये करार झाल्याचे पिल्लई यांनी चौकशीदरम्यान सांगितले होते. याअंतर्गत 100 कोटी रुपयांचा व्यवहार झाला, ज्यामुळे कविता यांच्या कंपनी ‘इंडोस्पिरिट्स’ला दिल्लीतील दारू व्यवसायात प्रवेश मिळाला.
पिल्लई यांनी असेही सांगितले की एक बैठक झाली ज्यामध्ये ते, कविता, विजय नायर आणि दिनेश अरोरा उपस्थित होते. दिलेल्या लाचेच्या वसुलीवर या बैठकीत चर्चा झाली.
साऊथ ग्रुप म्हणजे काय?
साऊथ ग्रुप हा दक्षिणेतील राजकारणी, व्यापारी आणि नोकरशहा यांचा समूह आहे. यामध्ये अरबिंदो फार्माचे प्रवर्तक सरथ रेड्डी, वायएसआर काँग्रेसचे लोकसभा खासदार एम. श्रीनिवासुलू रेड्डी, त्यांचा मुलगा राघव मागुंता आणि कविता यांचा समावेश होता. या गटाचे प्रतिनिधित्व अरुण पिल्लई, अभिषेक बोईनपल्ली आणि बुचीबाबू यांनी केले. या तिघांनाही दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App