प्रतिनिधी
पुणे : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव सध्या महाराष्ट्रात विशेष लक्ष घालून स्वतःचा पक्ष वाढवत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातले काही नेते त्यांच्या गळाला लागले आहेत. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीतले राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी देखील के. चंद्रशेखर राव यांची हैदराबाद मध्ये जाऊन आधीच भेट घेतली आहे.Surekha Punekar’s new political ploy; Chandrasekhar Rao’s Bharat Rashtra Samiti soon!!
मात्र ज्या नेत्यांना शिवसेना-भाजप युतीकडून अथवा महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत नाही तेच नेते भारत राष्ट्र समितीत प्रवेश करत असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीचा पश्चिम महाराष्ट्र देखील शिरकाव करण्याचा मनसुबा पार पडणार असून प्रख्यात नृत्यांगना सुरेखा पुणेकर लवकरच भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याची बातमी आहे. भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि राष्ट्रवादीच्या शेतकरी आघाडीचे माजी नेते शंकरअण्णा धोंडगे पाटील यांची सुरेखा पुणेकर यांनी नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीत सुरेखा पुणेकर यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेशाची चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सुरेखा पुणेकर मोठ्या कलावंत आहेत. त्यांचा सध्या तरी कुठे राजकीय प्रभाव नाही. परंतु, भारत राष्ट्र समिती प्रवेश करून त्या भविष्यात स्वतःचा प्रभाव निर्माण करू शकतात आणि एक वेगळी ओळख निर्माण करून घेऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App