प्रतिनिधी
मुंबई : काही दिवसांपूर्वीच झी न्यूजने घेतलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युतीला 165 ते 185 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर न्यूज एरिना इंडिया वृत्तसंस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात तोच निष्कर्ष रिपीट झाला असून भाजप आतापर्यंत मिळवलेल्या जागांपेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात मिळवेल, असा निष्कर्ष नव्या सर्वेक्षणात काढला आहे. शिवसेना – भाजप युतीला पूर्ण बहुमत मिळेलच, पण महाविकास आघाडी टिकली, तर त्याचा मोठा फायदा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला मिळत नसून, तो फायदा काँग्रेसला मिळत असल्याचे दिसत आहे.In the second consecutive survey, the BJP-Shiv Sena alliance has an absolute majority; First choice for Fadnavis; Thackeray – Pawar’s party lost!!
त्या उलट प्रसार माध्यमात सतत आपल्या ताकदीचे नॅरेटिव्ह चालविणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट हे दोन्ही पक्ष तोट्यात असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणाने काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची नक्कीच कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. तरी देखील या मोठ्या फेरबदलाचा जनतेवर अनुकूल परिणाम होऊन त्याचा राष्ट्रवादीला कोणताही फायदा होताना दिसत नाही, असाच निष्कर्ष सर्वेक्षणातून निघाला आहे.
तसेच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस टॉप वर असून ते 35 % नी पास झाले आहेत. बाकीचे सर्व उमेदवार 35 % च्या खाली असून अशोक चव्हाण यांनी दुसरा नंबर पटकावला आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे तळातून अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे आले आहेत.
Maharashtra Assembly Prediction as on date – BJP : 123-129SS : 25 NCP : 55-56INC : 50-53SS(UBT) : 17-19OTH : 12 Findings – ➡️ BJP will reach its highest ever tally in Maharashtra. ➡️ No of Others will go up as voting day will approach. ➡️ Eknath Shinde’s Shiv Sena will… pic.twitter.com/zePs0kYqmu — News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023
Maharashtra Assembly Prediction as on date –
BJP : 123-129SS : 25 NCP : 55-56INC : 50-53SS(UBT) : 17-19OTH : 12
Findings –
➡️ BJP will reach its highest ever tally in Maharashtra.
➡️ No of Others will go up as voting day will approach.
➡️ Eknath Shinde’s Shiv Sena will… pic.twitter.com/zePs0kYqmu
— News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023
न्यूज एरिना इंडिया @NewsArenaIndia महाराष्ट्र विधानसभेचा अंदाज –
निष्कर्ष : महाराष्ट्रात भाजपचा आतापर्यंतचा उच्चांक गाठणार आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तसतसे इतरांपैकी कोणीही वाढणार नाही.
मुख्यमंत्री पसंती :
देवेंद्र फडणवीस (35%), अशोक चव्हाण (21%), अजित पवार (14%), एकनाथ शिंदे (12%), उद्धव ठाकरे (9%), OTH (9%).
काँग्रेस केवळ त्यांच्या हिकमती असलेल्या उमेदवारांमुळेच जागा जिंकत आहे. जर त्यांनी बाजू बदलली तर त्यांची संख्या कमी होईल. (तिकीट वाटपाबाबत अनेक गृहीतके मांडण्यात आली होती.)
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App