ब्रिटनचे प्राऊड हिंदू पंतप्रधान ऋषी सुनक अक्षरधाम मंदिराला भेट देणार, पत्नी अक्षतासोबत करणार पूजा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे G20 परिषदेसाठी भारत दौऱ्यावर आहेत. आज ते शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राच्या आणि दुसऱ्या सत्राच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. रविवारी म्हणजेच उद्या सकाळी 6 ते 6:30 या वेळेत सुनक त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासोबत अक्षरधाम मंदिरात पोहोचतील, तर सकाळी 7:30 वाजता ते अक्षरधाम मंदिरातून निघतील. British PM Rishi Sunak will visit Akshardham temple tomorrow, will offer prayers with wife Akshata

मिळालेल्या माहितीनुसार, ते सुमारे 1 तास मंदिरात वेळ घालवणार आहेत. या दोघांचे स्वामी नारायण मंदिराचे मुख्य पुजारी स्वागत करतील आणि त्यानंतर त्यांना मुख्य मंदिरात नेऊन पूजा केली जाईल. मंदिरात देवाचे दर्शन घेतल्यानंतर तासभर येथे मुक्काम करणार आहेत. मंदिर परिसराच्या आत मुख्य मंदिराच्या मागे आणखी एक मंदिर असल्याचे सांगितले जात आहे, जिथे जलाभिषेक केला जातो. त्यामुळे ब्रिटीश पंतप्रधानही तेथे जलाभिषेक करू शकतात.


जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ‘भारताचे जावाई’ असं संबोधलं जातं तेव्हा त्यांना कसं वाटतं?


 

यानंतर स्वामी नारायण मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यासोबत ऋषी सुनक यांचा फोटो मंदिराच्या मुख्य दरवाजाबाहेर काढण्यात येणार आहे. पुजार्‍यासोबत फोटो काढल्यानंतर ऋषी सुनक त्यांच्या पत्नीसोबत वेगळे फोटो काढतील, कारण पुजारी महिलांसोबत फोटो काढत नाहीत.

ऋषी सुनक त्यांच्यासोबत काही छायाचित्रे आठवणी म्हणून ब्रिटनला घेऊन जाणार आहेत. मंदिर नेहमी पूर्णपणे स्वच्छ असते. या भागातील डीसीपी आणि जॉइंट सीपी यांनी यापूर्वीच भेट देऊन अक्षरधाम मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

शुक्रवारी भारतात आल्यानंतर पंतप्रधान सुनक यांनी नवी दिल्लीतील ब्रिटिश कौन्सिलच्या मुख्यालयात स्थानिक शाळेतील काही मुलांची भेट घेतली. ऋषी सुनक यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षताही उपस्थित होती. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती ब्रिटिश कौन्सिलमध्ये पोहोचल्यानंतर लॉबीमध्ये फुटबॉलसोबत ट्रिक्स करताना दिसल्या.

British PM Rishi Sunak will visit Akshardham temple, will offer prayers with wife Akshata

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात