ईशा फाऊंडेशनच्या सद्गुरूंवर मेंदूची शस्त्रक्रिया; मेंदूच्या एका भागात सूज आणि रक्त गोठले होते

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशन कोईम्बतूरचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अनेक दिवसांपासून त्यांना डोकेदुखीची समस्या जाणवत होती. ऑपरेशननंतर त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे.Brain surgery on Isha Foundation’s Sadhguru; There was swelling and blood clots in one part of the brain

अपोलो दिल्लीचे न्यूरो सर्जन, डॉ. विनीत सुरी यांनी हेल्थ बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, सद्गुरूंच्या मेंदूच्या एका भागात सूज आणि रक्त गोठण्याचा प्रकार त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. मात्र 17 मार्च रोजी झालेल्या ऑपरेशननंतर त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.



गेल्या चार आठवड्यांपासून डोकेदुखी

ईशा फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सद्गुरु गेल्या 3-4 आठवड्यांपासून डोकेदुखीची तक्रार करत होते. तरीही ते सतत काम करत होते. 14 मार्च रोजी त्यांनी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. विनीत सुरी यांचा सल्ला घेतला.

त्यांच्या डोक्याच्या एका भागात रक्त जमा होत असल्याचे एमआरआयमध्ये स्पष्ट झाले. तसेच त्यांच्या मेंदूच्या एका भागावर सूज देखील आहे. असे असतानाही त्यांनी काही महत्त्वाच्या बैठका सुरूच ठेवल्या. 17 मार्च रोजी त्यांच्या वेदनांमध्ये लक्षणीय वाढ झाली, त्यानंतर त्यांना अपोलो दिल्लीमध्ये दाखल करण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर सद्गुरू मजेदार शैलीत बोलले, म्हणाले- डोके रिकामे निघाले
17 मार्चलाच डॉक्टरांच्या पथकाने ऑपरेशन करून गाठी काढल्या. त्यांना काही काळ लाईफ सपोर्ट सिस्टीमवरही ठेवण्यात आले होते. सद्गुरूंच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. बुधवारी स्वतः सद्गुरुंनीही एक व्हिडिओ जारी करून त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगितले.

डॉक्टरांनी माझे डोके उघडून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही सापडले नाही, असे त्यांनी गमतीने सांगितले. डोके पूर्णपणे रिकामे होते म्हणून त्यांनी ते पुन्हा शिवले. आता मी ठीक आहे.

Brain surgery on Isha Foundation’s Sadhguru; There was swelling and blood clots in one part of the brain

 

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात