बंगालमध्ये भाजप कार्यालयाबाहेर ‘बॉम्ब’ सापडल्याने खळबळ, पोलिसांची परिसरात शोध मोहीम सुरू

bomb was found outside BJP office in Bengal, police search operation in the area to

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील भाजप कार्यालयाबाहेर रविवारी स्फोटक पदार्थ आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. ही बाब शहरात उघडकीस येताच बंगाल पोलिसांचे पथक बॉम्बशोधक पथक व श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यालयाबाहेर श्वानपथक, पोलिस दल आणि बॉम्बशोधक पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. कार्यालयाच्या आत आणि बाहेर सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे. bomb was found outside BJP office in Bengal, police search operation in the area to

पोलिसांनी निवेदन जारी केले

कोलकाता पोलिसांनी या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यानुसार माहेश्वरी हाऊसच्या बाहेरून जप्त करण्यात आलेली संशयास्पद वस्तू बॉम्ब नसून त्यासारखी दिसणारी गोल वस्तू होती. या संशयास्पद वस्तूला सुतळीने गुंडाळून बॉम्बसारखे दिसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस परिसरात लावलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत.

ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया X वर या प्रकरणासंदर्भात एक ट्विट पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, कोलकाता शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या भाजपच्या 6, मुरलीधर लेन कार्यालयाबाहेर देशी बनावटीचा बॉम्ब सापडला आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराची चौकशी करणारी हायप्रोफाईल फॅक्ट फाइंडिंग समिती कार्यालयात येणार असतानाच हा बॉम्ब सापडला. यावेळी माजी मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, यूपीचे डीजीपी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. याप्रकरणी मालवीय यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट जबाबदार धरले.

भाजप नेत्याने प्रश्न उपस्थित केला

पक्षाची समिती रविवारी भाजप कार्यालयात बैठक घेण्यासाठी गेली होती. असा सवाल पश्चिम बंगालमधील भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला. ते म्हणाले की, देशात निवडणुका होत असताना केवळ बंगालमध्येच हिंसाचार का होतो? बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान हिंसाचार घडवला होता.

bomb was found outside BJP office in Bengal, police search operation in the area to

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात