वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांना धमकीचे ईमेल पाठवण्यात आले आहेत. या ईमेलमध्ये रुग्णालयांना बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली अग्निशमन सेवेनुसार, त्यांना दोन हॉस्पिटलमधून कॉल आले आहेत, पहिला बुराडी सरकारी हॉस्पिटलमधून आणि दुसरा मंगोलपुरीच्या संजय गांधी हॉस्पिटलमधून. दिल्ली अग्निशमन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.Bomb threat to two Delhi hospitals, fire brigade and police teams at the scene
ई-मेल मिळाल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले, त्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक रुग्णालयात पोहोचले. ज्या रुग्णालयांना बॉम्बच्या धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे त्यात बुराडीचे सरकारी रुग्णालय आणि मंगोलपुरीचे संजय गांधी रुग्णालय यांचा समावेश आहे.
150 शाळांना धमक्या
याआधी बुधवार, 1 मे रोजी दिल्ली-एनसीआरमधील सुमारे 150 शाळांना बॉम्बची अफवा असलेला ईमेल पाठवण्यात आला होता. यासाठी गुन्हेगारांनी रशियन ईमेल सेवेचा वापर केला. ही सेवा वापरकर्त्यांना निनावी राहण्यास आणि बेकायदेशीर कृत्य लपविण्यास मदत करते.
ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्व शाळांमध्ये जाऊन शोधमोहीम राबवली. पोलीस कुत्रे आणि बॉम्बशोधक पथकासह शाळांमध्ये पोहोचले. धमकी देणारा ईमेल बनावट असल्याचे नंतर उघड झाले. पोलिसांनी कुटुंबीयांना घाबरू नका असे आवाहन केले होते.
दिल्लीतील शाळांना अनेकदा अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल पाठवण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील आरकेपुरम येथील डीपीएस शाळेच्या मुख्याध्यापकांना असाच ईमेल पाठवण्यात आला होता. असाच ईमेल साकेत येथील एमिटी स्कूललाही फेब्रुवारीमध्ये पाठवण्यात आला होता. या ईमेलमध्ये शाळेकडून पैसेही मागितले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App