आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Airlines देशाच्या विमान कंपन्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळण्याची मालिका सुरूच आहे. शनिवारनंतर रविवारीही अनेक विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या. यानंतर एकच गोंधळ उडाला. विमानांना घाईघाईत आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमान वाहतूक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (20 ऑक्टोबर) विविध एअरलाइन्सच्या किमान 14 फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. यामध्ये विस्तारा, आकासा आणि इतर अनेक विमान कंपन्यांचा समावेश आहे.Airlines
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सिंगापूरहून पुण्याला येणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर घबराट पसरली होती. विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर त्याचे पुणे विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. याशिवाय लखनऊहून मुंबईला जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानात बॉम्ब असल्याची बातमी रविवारीच मिळाली होती. यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंगही करावे लागले.
विमानात बॉम्बची धमकी मिळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी शनिवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत ३० हून अधिक विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. यानंतर विमानतळांवर विमानांना वेगळे करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर विमानांची तपासणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही फ्लाइटमधून कोणताही संशयास्पद किंवा स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App