BJP : महाविकास आघाडी जागावाटपाच्या खोड्यात अडकली; भाजपने 99 उमेदवारांची यादी आणली!!

BJP

विशेष प्रतिनिधी

मुंबई :BJP  एकीकडे महाविकास आघाडी जागावाटपाशा खोड्यात अडकली, दुसरीकडे भाजपने एक दोन नव्हे, तर तब्बल 99 उमेदवारांची यादी बाहेर आणली. यातून भाजपने केवळ महाविकास आघाडीवरच नव्हे, तर शिंदे + अजितदादांवरही कुरघोडी केली आहे. शिवाय या यादीत एखाद दुसरा अपवाद वगळता तिकीट कापाकापी देखील दिसली नाही.BJP

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झाली होती. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश होता. त्यांच्या बैठकीत यादीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.



दानवेंच्या मुलाला, तर चव्हाणांच्या मुलीला संधी

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. अर्थातच तुलनेने सुरक्षित असणाऱ्या आणि वादग्रस्त नसलेल्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे.

या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.

भाजपची पहिली उमेदवार यादी 

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार – विजयकुमार गावीत
धुळे शहर – अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावळे
भुसावळ – संजय सावकारे
जळगाव शहर – सुरेश भोळे
चाळीसगाव – मंगेश चव्हाण

जामनेर -गिरीश महाजन
चिखली – श्वेता महाले
खामगाव – आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवली – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार
वर्धा – पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर दक्षिण – मोहन मते

नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव – अशोक उडके
यवतमाळ – मदन येरवर
किनवट – भीमराव केरम
भोकर – श्रीजया चव्हाण
नायगाव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड

हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डीकर
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलाण – दिलीप बोरसे
चांदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाड – किसन कथोरे
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
डोंबिवली – रवींद्र चव्हाण

ठाणे – संजय केळकर
ऐरोली – गणेश नाईक
बेलापूर – मंदा म्हात्रे
दहिसर – मनीषा चौधरी
मुलुंड – मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम
विले पार्ले – पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम – राम कदम
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा – कालिदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा – राहुल नार्वेकर
पनवेल – प्रशांत ठाकूर
उरण – महेश बाल्दी

दौंड- राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती – माधुरी मिसाळ
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव – मोनिका राजळे
राहुरी – शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड – राम शिंदे
केज – नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख

माण -जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ

BJP brings in 99 candidates list in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात