बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच तिची जवळची मैत्रीण अमृता अरोराचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. अलीकडेच करिना आणि अमृता या दोन्ही अभिनेत्रींनी मित्रकंपनीसोबत कोरोना नियमांचे उल्लंघन करत अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.Bollywood actresses Kareena Kapoor and Amrita Arora were infected with corona, recently attended several parties
प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच तिची जवळची मैत्रीण अमृता अरोराचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. अलीकडेच करिना आणि अमृता या दोन्ही अभिनेत्रींनी मित्रकंपनीसोबत कोरोना नियमांचे उल्लंघन करत अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.
करिनाला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. बीएमसीने करिना कपूर आणि अमृता अरोरा यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची RTPCT चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
बीएमसी आता त्या सर्व लोकांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहे, जे यापूर्वी त्यांच्यासोबत पार्ट्यांमध्ये होते किंवा इतर कोणत्याही प्रकारे संपर्कात आले होते.दरम्यान, यापूर्वी करिना कपूर तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करताना दिसली होती.
या पार्टीत तिची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोराही होती. ही पार्टी अनिल कपूरची मुलगी रिया कपूरच्या घरी ठेवण्यात आली होती. जिथे सगळ्यांनी एकत्रित वेळ घालवला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App